Varun Tej and Lavanya Tripathi's engagement Instagram @varunkonidela7
मनोरंजन बातम्या

Varun Tej - Lavanya Tripathi Photo: अखेर लावण्या त्रिपाठी - वरून तेजचा साखरपुडा पार पडला: फोटो व्हायरल

Lavanya Tripathi-Varun Tej: लावण्य आणि वरुण यांनीही त्यांचे इन्स्टाग्राम अपडेट केले आहेत.

Pooja Dange

Varun Tej and Lavanya Tripathi's Engagement: 'मिस्टर' आणि 'अंतरीक्षम'चे सहकलाकार वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांचा साखरपुडा पार पडला आहे. शुक्रवारी 9 जून रोजी वरुणच्या हैदराबाद येथील घरी एक खाजगी सोहळा संपन्न झाला.

दोघांनी एकमेकांना अंगठी घालून नव्या प्रवासाला सुरुवात केली. यावेळी वरूनच चुलत भाऊ राम चरण, काका सुपरस्टार चिरंजीवी, अल्लू अर्जुन आणि कुटुंबीय समारंभाला उपस्थित होते. या सोहळ्याला कुटुंबाशिवाय इतर कोणालाही आमंत्रित करण्यात आले नव्हते.

लावण्य त्रिपाठी तिच्या एंगेजमेंटसाठी वरून तेजच्या सिकंदर येथील घरी गेली होती. यादरम्यान, हिरव्या साडी आणि केसात गजरा मळलेली लावण्या खूप सुंदर दिसत होती. त्यांचा साखरपुडा जरी कौटुंबिक सोहळ्यात पार पडला असला तरी त्यांच्या लग्न एक ग्रँड वेडिंग असणार आहे. (Latest Entertainment News)

लावण्य आणि वरुण यांनीही त्यांचे इन्स्टाग्राम अपडेट केले आहेत. वरुन आणि लावण्या यांनी त्यांच्या त्यांच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

वरुणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत 'माझे प्रेम सापडले!' असे कॅप्शन दिले आहे. तर लावण्याने '२०२६ पासून अनंतापर्यंत असलेले प्रेम अखेर आयुष्यभरासाठी मिळाले', असे कॅप्शन देत फोटो शेअर केले आहेत.

लावण्यच्या पोस्टवरून हे स्पष्ट झाले आहे की दोघेही 2016 पासून एकमेकांना डेट करत आहेत. पण उघडपणे कधीही त्यांनी ते व्यक्त केले नव्हते. त्यांच्या अफेअरच्या बातम्या अनेकदा मीडियात आल्या होत्या, पण दोघांनीही त्यांचा स्वीकारल्या नाहीत आणि नाकारल्या नाहीत. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी दोघांनीही त्यांच्या एंगेजमेंटची घोषणा केली आणि चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला.

ज्यामध्ये वरुण तेज हा अभिनेता आणि निर्माता नागेंद्र बाबूचा मुलगा आहे आणि चिरंजीवी पवन कल्याणचा पुतण्या आहे. त्याच बरोबर लावण्य त्रिपाठी देखील तेलगू अभिनेत्री आहे. या दोघ्यांच्या प्रेमाच्या चर्चा 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मिस्टर' चित्रपटापासून होत असल्या तरी ते दोघे आधीपासूनच डेट करत होते.

अनेक दाक्षिणात्य सेलिब्रिटींनी वरुन आणि लावण्याचे अभिनंदन केले आहे आहे. तसेच अभिनेता सुनील शेट्टीने देखील या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT