Fukrey 3 Poster Instagram @fukravarun
मनोरंजन बातम्या

Fukrey 3 Poster: 'फुकरे 3'च्या कलाकारांचा अजब अंदाज; भन्नाट पोस्टरसह चित्रपटाची रिलीज डेट आऊट

Fukrey 3 Trailer: लवकरच फुकरे 3 चित्रपटाचा ट्रेलर देखील आपल्या भेटीला येईल.

Pooja Dange

Fukrey 3 Movie will Released Soon:

बॉलिवूडमधील काही चित्रपट पाहताना आपल्याला कधीच कंटाळा येत नाही. असाच एक चित्रपट म्हणजे फुकरे. फुकरे चित्रपटाचे २ भाग आपल्या भेटीला आले. प्रेक्षक फुकरेच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

काही महिन्यांपूर्वी चित्रपटाचे एक पोस्टर आपल्या भेटीला आले होते. त्यामुळे लवकरच प्रेक्षकांना याचित्रपट पाहायला मिळणार असे वाटले होते. परंतु चित्रपट प्रदर्शित झालाच नाही. अखेर चित्रपटाची रिलीज देत जाहीर झाली आहे. २८ सप्टेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. लवकरच चित्रपटाचा ट्रेलर देखील आपल्या भेटीला येईल.

'फुकरे ३'चे नवीन पोस्ट

फुकरे चित्रपटातील चुचा, भोली पंजाबन, लाली, हनी या सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता 'फुकरे ३'मधील नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला अली आहेत. तसेच चित्रपटातील संपूर्ण कास्ट आणि त्यांचे रोल देखील रिव्हील झाले आहेत.

वरून शर्मा या पोस्टरवर मोराच्या रूपात दाखविणायत आला आहे. तर पुलकित सम्राट लटकताना दिसत आहे. तर पंकज त्रिपाठी रस्त्याच्या मधोमध बसलेला दाखविण्यात आला आहे. तर गुंड भोली पंजाबन म्हणजे रुचा चड्ढा पॉलिटिशियन दाखविण्यात आली आहे. (Latest Entertainment News)

फुकरे २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. त्यानंतर निर्मात्यांनी २०१७ मध्ये फुकरे रिटर्न प्रेक्षकांच्या भेटीला आणला. हा चित्रपट देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. आता या फ्रेंचायजीचा नवीन चित्रपट फुकरे ३ लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT