Varun Dhawan and wife Natasha spotted at Mumbai fertility clinic Instagram @varundvn
मनोरंजन बातम्या

Varun Spotted With Wife: वरून-नताशा देणार गुड न्यूज? जोडप्याला क्लिनिक बाहेर पाहून नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण

Varun Dhawan With Natasha: वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा (नताशा दलाल) एका क्लिनिकच्या बाहेर स्पॉट झाले.

Pooja Dange

Varun Dhawan spotted at Mumbai fertility clinic: बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकले आहेत. तर काही पालकत्व अनुभवत आहेत. यात रणबीर आलियापासून ते प्रियांका चोप्रा-निक जोनासपर्यंत अनेकनाचा समावेश आहे. तर काही बॉलिवूड कलाकारांनी लवकरच आनंदाची बातमी द्यावी अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. वरुण धवन अशा सेलिब्रिटी पैकी एक आहे. आता कदाचित वरुण धवन लवकरच ही आनंदाची बातमी शेअर करेल.

अलिकडेच वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा (नताशा दलाल) एका क्लिनिकच्या बाहेर स्पॉट झाले होते, त्यानंतर वरून आणि नताशा आई-वडील होणार असल्याचे बोलले जात आहे.

इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होता आहे . या व्हायरल व्हिडिओमध्ये वरुण धवन आणि नताशा एका क्लिनिकमधून बाहेर पडताना दिसत आहेत. यादरम्यान वरुण फोनवर कोणाशी तरी बोलताना दिसत आहे, तर नताशा कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. पापाराझींशी बोलताना वरूण काहीही बोलला नसला तरी सर्वत्र या अफवा फसरल्या आहेत.

तर या व्हिडिओमधील वरूनच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर त्याने वरुण निळ्या रंगाच्या टी-शर्टसह आणि काळी रंगाची पँट घातली आहे, तर नताशाने काळ्या आणि पांढर्‍या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे.

नताशा आणि वरुण धवनचे जानेवारी २०२१ मध्ये लग्न झाले होते. त्यांच्या लग्नाला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. अशा परिस्थितीत कुटुंबीयांसह वरुणचे चाहतेही गुड न्यूजची वाट पाहत आहेत. वरून आणि नताशाबद्दल लावण्यात येत असलेल्या या अंदाजात कितपत तथ्य आहे हे आपल्याला कळेलच.

वरुणचे चाहते आतापासूनच हा आनंद साजरा करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, ही खूप आनंदाची बातमी आहे. त्याचवेळी दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, भाऊ आजारीही असू शकतो, त्याला प्रायव्हसी द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT