Vanita Kharat South Indian Look Saam TV
मनोरंजन बातम्या

Vanita Kharat In South Movie: कॉमेडी क्वीन वनिता खरातची South मध्ये एन्ट्री? सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं लक्ष

Vanita Kharat Post: वनिताने तिचा ‘साऊथ इंडियन’ लूक नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Pooja Dange

Vanita Kharat New Look:

अभिनेत्री वनिता खरात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी मालिकेतून नेहमीच आपल्या भेटीला येत असते. MHJ सोबतच वनिता चित्रपटांमध्ये देखील विविध भूमिका साकारत असते. मराठीसोबतच हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये देखील वनिता काम करते. वनिताचा चाहता वर्ग देखील खुप मोठा आहे. वनिताचे चाहते नेहमीच ती कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. मराठी, हिंदीनंतर वनिता दाक्षिणात्य चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.

वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या वनिताचा ‘साऊथ इंडियन’ लूक नुकताच समोर आला आहे. सोशल मीडियावर वनिताने तिचा हा लूक शेअर केला आहे. ती नेमकी कोणत्या चित्रपटात काम करणार आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

या पोस्टच्या कॅप्शनमध्येच वनिताने याविषयी सांगितले आहे. वनिताने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ''एकदा येऊन तर बघा' माझा South Indian अवतार ! प्रेमळ माणसांनी प्रेमाने केलेली कलाकृती! २४ नोव्हेंबरपासून फक्त सिनेमागृहात'एकदा येऊन तर बघा'' असं म्हणत तिने थेट चित्रपटाचं आमंत्रण प्रेक्षकांना दिलं आहे.

वनिता खरात लूक

या फोटोमधील वनिता खरातच्या लूकविषयी बोलायचे झाले तर, तिने केसांची वेणी घातली असून त्यात गजरा माळला आहे. जांभळ्या रंगाच्या परकरवर लाल ब्लाउज आणि त्यावर पिवळी आढणी घेतली आहे. तसेच वनिताने दाक्षिणात्य पद्धतीचे दागिने देखील घातले आहेत. डोक्याला गंध देखील लावले आहे.

वनिताने हा लूक का केला आहे? चला जाणून घेऊया. येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटात वनिता दाक्षिणात्य अंदाजात दिसणार आहे. वेगळी भूमिका करण्याची संधी प्रत्येक कलाकार शोधत असतो. 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या निमित्ताने ही संधी मला मिळाली असून माझं हे पात्र प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील, असा विश्वास वनिताने व्यक्त केला आहे. (Latest Entertainment News)

'एकदा येऊन तर बघा' चित्रपटात वनिता खरातसह गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, रोहित माने असे दमदार कलाकार या दिसणार आहेत. लेखक-अभिनेता प्रसाद खांडेकर 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Neeti : वैवाहिक जीवनात कटकट, चीडचीड नको; तर 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra Live News Update: भांडुपमधील एका सार्वजनिक शौचालयात सापडलं स्त्री जातीचं अर्भक

Election Commission: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

Hair Care: हेल्दी आणि शायनी केस हवेत? मग 'हा' पदार्थ नक्की ट्राय करा, आठवड्याभरात दिसेल फरक

Fodnicha Bhat Recipe : ऑफिसवरून आल्यावर झटपट बनवा 'असा' चटपटीत फोडणीचा भात, आवडीने खातील सगळे

SCROLL FOR NEXT