Bigg Boss Marathi 5 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5: "यामुळे मी घराबाहेर पडलो..."; बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर वैभवने कोणावर साधला निशाणा

Bigg Boss Marathi Season 5 Vaibhav Chavan Interview: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर वैभवने बिग बॉसच्या घरातील त्याच्या खेळीवर भाष्य केले आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीझन ५ ची सध्या जबरदस्त चर्चा आहे. या शोमधील एक एक स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडत आहेत. अलिकडेच आर्या आणि वैभव घराबाहेर पडले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर वैभवने मुलाखत दिली आहे.

बिग बॉसच्या घरात वैभव टीम ए मध्ये होता. या टीममध्ये त्यांच्यासोबत निक्की, वैभव, अरबाज, धनंजय, वर्षा ताई आणि सूरज हे स्पर्धक होते. नुकतंच सकाळ प्रिमियर चॅनलशी वैभवने संवाद साधला. यावेळी वैभवने बिग बॉसच्या घरातील खेळीवर भाष्य केले आहे. मुलाखतीत त्याला, वैभव चव्हाण बिग बॉसच्या घरात मैत्रीसाठी, खेळ खेळण्यासाठी की ट्रॉफीसाठी गेला होता? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर वैभव म्हणाला, "मी नक्कीच ट्रॉफीसाठी गेलो होतो. मात्र काही गोष्टी अशा घडल्या की, त्या माझ्या हातात नव्हत्या. त्या गोष्टी मी नीट करू देखील शकत होतो.

पण मला असं वाटतं की त्यामध्ये मी जास्तच अडकून गेलो होतो. मला देखील कळत होतं की मी कुठेतरी चुकतंय शेवटी..." या बद्दल मी बिग बॉसच्या घरात देखील माफी मागितली आणि प्रेक्षकांची देखील माफी मागतो की माझ्याकडून काही गोष्टी चुकल्या असतील तर.." टीम ए मध्ये वेभवने शेवटपर्यत मैत्री जपण्याचा प्रयत्न केला आणि यामुळे त्याला हा निर्णय घ्यावा लागला असे त्याने म्हटले. वैभवने, "तुम्ही दिलेले सल्ले मी फॉलो करायला हवे होते. पण मिळालेल्या संधीचं सोनं मला करता आलं नाही याचा मला दु:ख आहे" असंही वैभव म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nasrapur Case : नसरापूरच्या नरकासुरला फाशी का जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष, घटनेची A to Z टाईमलाईन

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

SCROLL FOR NEXT