urmila matondkar birthday  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urmila Matondkar Song: उर्मिला मातोंडकरला 'छम्मा छम्मा' गाण्यासाठी दिग्दर्शकांनी दिला होता नकार, आयकॉनिक गाणे 'या' कारणामुळे झाले हिट

छम्मा छम्मा गाणे सुरू होताच लोक थिएटरमध्ये नाचू लागले आणि नोटा उडवू लागले.

Saam Tv

Urmila Matondkar Iconic Song Story: 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकर आज ४९ वर्षांची झाली आहे. वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षापासून उर्मिला चित्रपटांमध्ये काम करत आहेत. उर्मिलाने तिच्या आयुष्याची ४ दशके इंडस्ट्रीला दिली आहेत. रंगीला, खूबसूरत, जानम समझा करो, जुदाई, सत्या सारखे हिट चित्रपट उर्मिलाच्या नावावर आहेत.

उर्मिला ही ९० च्या दशकातील टॉपची अभिनेत्री होती. पण राम गोपाल वर्माशी अफेअर असल्याचा बातम्यांचा परिणाम तिच्या करिअरवर झाला. हे प्रकरण तिच्या फिल्मी करिअरमधील मोठा अडथळा झाला. उर्मिलाला चित्रपट मिळणे बंद झाले आणि करिअर पुन्हा रुळावर आलेच नाही. उर्मिलाने ट्रॅकवर परत येण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न अयशस्वी ठरला.

उर्मिला मातोंडकर 1998 मध्ये आलेल्या चायना गेट चित्रपटातील 'छम्मा छम्मा' या गाण्यावर डान्स केला होता. उर्मिलाच्या कारकिर्दीतील हे सर्वात हिट गाणे आहे. एका वृत्तपात्राला दिलेल्या मुलाखतीत उर्मिलाने या गाण्याशी निगडित एक किस्सा शेअर केला आहे.

उर्मिलाने सांगितले की तिची एक मैत्रीण चायना गेट चित्रपट पाहण्यासाठी न्यूयॉर्कमधील थिएटरमध्ये गेली होती. प्रेक्षक शांत बसून संपूर्ण चित्रपट पाहत होते, पण 'छम्मा छम्मा' गाणे सुरू होताच लोक थिएटरमध्ये नाचू लागले आणि नोटा उडवू लागले.

उर्मिलाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, तिने 'छम्मा छम्मा' या आयकॉनिक गाण्यासाठी 5 किलोचा लेहेंगा आणि 15 किलोचे दागिने घातले होते. जेव्हा उर्मिला गाण्याच्या लुक टेस्ट आणि फोटोशूटसाठी तयार झाली तेव्हा दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी तिला सांगितले की हे दागिने खूप आहेत. त्यावर उर्मिला म्हणाली, बंजारनच्या लूकसाठी हे दागिने आवश्यक आहेत.

राजकुमार संतोषी यांनी उर्मिलाला समजावून सांगितले, तू खूप दागिने घातले केले आहेस, नंतर तुला इतके दागिने घालून नाचणे कठीण होईल. नंतर हे दागिने तू काढू शकणार नाहीस. कारण आम्हाला हा लूक गाण्याचे शूट संपेपर्यंत असाच ठेवायचा आहे.

उर्मिलाने दिग्दर्शकाचे ऐकले नाही आणि १५ किलो दागिन्यांसह शूट करण्याचा निर्णय घेतला. गाण्याचे शूटिंग सुरू होताच, उर्मिलाला तिच्या दागिन्यांमुळे खूप जखमा होऊ लागल्या, परंतु उर्मिलाने सर्व दागिन्यांमध्ये डान्स नृत्य केला आणि गाण्याचे शूटिंग पूर्ण केले.

उर्मिला मातोंडकर आता चित्रपट दिसत नसली तरी राजकारणात सक्रिय आहे. तिने 42 व्या वर्षी मोहसीन मीर या तिच्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान मॉडेल आणि व्यावसायिकासोबत लग्न केले.

'लक बाय चान्स' या बॉलिवूड चित्रपटामुळे मोहसीन लोकप्रिय झाला होता. आता उर्मिला राजकारणात सक्रिय आहे. तसेच उर्मिला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT