Urfi Javed Video Goes viral | उर्फी जावेदचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात तिला नीट चालताही येत नसल्याचं दिसतं. SAAM TV
मनोरंजन बातम्या

Urfi Javed VIDEO : पार्टीहून आलेल्या उर्फी जावेदला चालताही येईना, दोघींनी हाताला धरलं, शब्दही फुटेना, VIDEO बघून सगळेच हैराण

Urfi Javed Video goes viral : मॉडेल उर्फी जावेदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिची अवस्था बघून आजूबाजूचे लोकही हैराण झाले.

Saam Tv

सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर उर्फी जावेद आता फॅशनमुळं नाही तर, एका वेगळ्याच कारणानं पुन्हा चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात उर्फी एका पार्टीहून बाहेर आलेली दिसत आहे. तिचे दोन्ही हात दोघींनी पकडले आहेत. तिला चालताही येत नाही. तिची अवस्था बघून सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात आहे.

उर्फी जावेद सोशल मीडिया स्टार आहे. फॅशन, कपडे, व्हिडिओ यामुळं ती सोशल मीडियावर तुफान हिट होते. पण आता तिचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळं ती ट्रोल होतेय. मीडिया रिपोर्टनुसार, ती एका पार्टीमधून बाहेर आली. पण तिला धड चालताही येत नव्हतं. तिला दोन्ही हाताला धरून कारमध्ये बसवलं. पापाराझींनी तिला बघून गर्दी केली. तिला प्रश्नही विचारले. पण काही बोलण्याच्या मनस्थितीत ती नव्हती.

उर्फी जावेदचा व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करा!

उर्फीचा व्हिडिओ बघा

पार्टीहून येताना उर्फीला नीट चालताही येत नव्हतं. रिपोर्टनुसार तिची बहीण आणि अन्य एका तरुणीनं तिला पकडून ठेवलं. पापाराझींनी तिला प्रश्न विचारले. त्यावर तिला काही बोलताही आलं नाही. जाऊ द्या, असं दोन-तीन शब्दांत उत्तर देऊन ती कारमध्ये बसण्यासाठी निघाली.

उर्फी ट्रोल झाली!

उर्फी जावेदचा या अवस्थेतला व्हिडिओ बघून नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. वेगवेगळ्या कमेंट केल्या जात आहेत. आजकाल जरा जास्तच ....अशी एका नेटकऱ्यानं कमेंट केली आहे. आता हे असं काही पहिल्यांदाच घडलं नाही. याआधीही तिचे अशा अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

उर्फीनं बॉलिवूडमध्ये केलंय डेब्यू

याचवर्षी उर्फी जावेदनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. एकता कपूरच्या लव्ह सेक्स और धोखा २ मधून तिनं अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली आहे. याशिवाय ये रिश्ता क्या कहलाता है, कसौटी जिंदगी की यासारख्या मालिकांमध्येही तिनं काम केलं आहे. पण खऱ्या अर्थानं तिला बिग बॉस ओटीटी १ मधून प्रसिद्धी मिळाली, असं सांगितलं जातं. या शोमधून बाहेर पडल्यानंतर तिनं फॅशनमुळं सगळ्यांनाच चकित केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

SCROLL FOR NEXT