Urfi Javed Tweeted For MC Stan: बिग बॉस १६ हा शो संपायला काहीच दिवस उरले आहेत. शालीन, शिव, प्रियांका, एमसी स्टॅन आणि अर्चना हे टॉप फाईव्ह स्पर्धक ठरले आहेत. प्रेक्षकांच्या मतांवरच ठराणार आहे की कोण ठरणार बिग बॉस १६चा विजेता. या पाचही स्पर्धकांचे फॅन्स त्यांना विजेता बनविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. सेलिब्रिटी सुद्धा त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला जिंकण्यासाठी मदत करताना दिसत आहेत.
नेहमीची चर्चेत राहणाऱ्या उर्फीने देखील तिच्या आवडत्या स्पर्धकाला समर्थन दिले आहे. उर्फीने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या आवडत्या स्पर्धकाला मत दिले आहे का याची विचारणा केली आहे. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की उर्फीचा आवडता स्पर्धक आहेत तरी कोण?
जर तुम्ही उर्फीची सोशल मीडियावरील पोस्ट पहिली असेल तर तुमच्या लक्षात येईल उर्फी बिग बॉस १६मधील कोणत्या स्पर्धकाला सपोर्ट करत आहे. पाहूया उर्फीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, 'क्या रे शेंबडी, एमसी स्टॅन के लिये वोट किया क्या?#bb16 #biggboss #MCStan'. तर यावरून तुम्हाला समजले असेल की उर्फी रॅपर एमसी स्टॅनला सपोर्ट करते.
उर्फीने अगदी एमसी स्टॅनच्या भाषेत ही पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिच्या आणि एमसी स्टॅनच्या चाहत्यांना वोट करण्याचे आवाहन केले आहे. उर्फीच्या या पोस्टवर अनेक नेटकरी एमसी स्टॅनच्या स्टाईलमध्ये कमेंट करून त्याच्या प्रतिक्रिया देत आहते. तसेच एमसी स्टॅनचा जिंकणार असे म्हणत आहेत.
'बिग बॉस १६' ट्रॉफी कोण जिंकणार आहे आपल्याला काही दिवसात कळणारच आहे. गेल्या आठवड्यात सुंबुल तौकीर खान बाहेर गेली. तर मिडवीकमध्ये झालेल्या एव्हिक्शनमधून निमृत कौर अहलूवालिया लिव्ह वोटिंगमुळे घराबाहेर गेली.