urfi javed  Saam Tv
मनोरंजन बातम्या

urfi javed : हाय मेरा दिल... ; उर्फीच्या ब्रोकन हार्ट लूकवर चाहते फिदा

सोशल मीडियावर उर्फी जावेदच्या 'ब्रोकन हार्ट' लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अतरंगी आउटफिट्स आणि बोल्ड लूकने कायमच इंटरनेटचा पारा वाढवणारी सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी ​​जावेदच(Urfi Javed) ह्रदय काम करायचे थांबल की काय? असं म्हणायला हरकत नाही. हटके स्टाईलने नेहमीच चर्चेत राहणारी फॅशनिस्टा(Fashion) उर्फी जावेदचा नवीन लूक समोर आला आहे. सोशल मीडियावर उर्फीच्या 'ब्रोकन हार्ट'ने धूमाकूळ घातला आहे.

उर्फीने तिच्या अधिकृत इस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये उर्फीने 'ब्रोकन हार्ट' आउटफिट परिधान केला आहे. अनेकदा उर्फी जावेद नवनवीन संकल्पनावर तिचे आउटफिट्स तयार करत असते. कधी गॅलेक्सी तर कधी काजूकतली अशा अनेक थीमवर उर्फी तिचे आउटफिट्स तयार करत असते. आता देखील तिने भन्नाट लूक केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर तूफान चर्चेत आहे.

उर्फी जावेद तिच्या बोल्डनेसमुळं आणि फॅशन स्टाईलमुळं नेहमी चर्चेत असते. अलीकडेच उर्फी लाल रंगाच्या ब्रोकन हार्ट टॉप आणि मिनी स्कर्टमध्ये दिसली. उर्फीने साखळीच्या सहाय्याने तिचा 'ब्रोकन हार्ट' लूक पूर्ण केला आहे. त्याचसोबत उर्फीने केसांचा हायपोनी आणि न्यूड मेकअप केला आहे. या लूकमधला उर्फी जावेदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उर्फी जावेदची एक छोटी फॅन तिच्यासोबत सेल्फी घेताना दिसते आहे.

व्हायरल गर्ल उर्फी जावेदची स्टाईल आजकाल चर्चेचा विषय आहे. सोशल मीडियावर उर्फीचे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. खरं तर उर्फी जावेद ही तिच्या प्रोफेशनल नाही तर पर्सनल लाईफमुळे लाईटमेट होत आहे. अनेकदा उर्फी तिच्या विचित्र कपड्यांमुळे प्रकाशझोतात आली आहे. आताचा तिचा लूक म्हणजे असाच एक एक्सपेरिमेंट म्हणावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT