Sa La Te Sa La Na Te Trailer lunch PR
मनोरंजन बातम्या

Sa La Te Sa La Na Te Movie: पत्रकार आणि पर्यावरणप्रेमींच्या नात्याची गोष्ट; 'स ला ते स ला ना ते' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Sa La Te Sa La Na Te Trailer lunch : पर्यावरण, पत्रकारिता, प्रेम, राजकारण, गुन्हेगारी आदी मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या 'स ला ते स ला ना ते' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे.

Shruti Vilas Kadam

Sa La Te Sa La Na Te Movie: कमी श्रमात आणि कमी काळात अधिक पैसा कमावण्याची आकांक्षा असलेला बडबडा तरुण आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अबोल तरुणीच्या नात्याचं व्याकरण सांगणारी कथा म्हणजे "स ला ते स ला ना ते" हा चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते पुणे येथे लाँच करण्यात आला असून दमदार स्टारकास्ट असलेल्या ट्रेलरने चित्रपटाविषयीचे कुतूहल आणखी वाढवले आहे.

अतिशय बडबड करणारा, गोडबोलू तरुणाची ओळख अचानक एका पर्यावरणप्रेमी तरुणीसोबत होते. या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात होते आणि गोष्टी थेट लग्नापर्यंत पोहचतात. हा तरुण विदर्भातील चंद्रपूरमधील न्यूज चॅनेलचा पत्रकार असतो. पर्यावरणप्रेमी तरुणी आणि या तरुण पत्रकाराच्या नात्याच्या व्याकरणाची गोष्ट या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. पत्रकारिता, पर्यावरणाचे प्रश्न, विकास असे मुद्देही या चित्रपटातून हाताळण्यात आले आहेत. पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या तरुणाला पत्रकारितेच्या माध्यमातून लवकर श्रीमंत होण्याची चटक लागते. त्यासाठी तो अनेक जुगाड करू लागतो. अशाच एका जुगाडात तो कसा अडकत जातो आणि त्याच्यावर काय आपत्ती ओढवते, हे या चित्रपटाचं कथानक आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरविषयी नागराज मंजुळे म्हणाले, आजपर्यंत न हातळलेला विषय या चित्रपटात मांडलेला आहे. अतिशय रंजक आणि रहस्य्मय असा हा ट्रेलर झाला आहे. सगळ्याच कलाकरांचा अभिनय उत्तम झाला आहे. संपूर्ण टीमला माझ्याकडून शुभेच्छा.

स्टुडिओ लॉजिकल थिंकर्स प्रस्तुत 'स ला ते स ला ना ते' या चित्रपटाची निर्मिती या चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले आहे. श्रीकांत बोजेवार, तेजेश घाडगे, संतोष कोल्हे यांनी पटकथा लेखन, श्रीकांत बोजेवार यांनी संवाद लेखन केलं आहे. विनायक जाधव यांनी छायांकन, सचिन नाटेकर यांनी संकलन, एकनाथ कदम यांनी कला दिग्दर्शन, रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत, रोहित प्रधान यांना ध्वनिआरेखन केलं आहे. 'स ला ते स ला ना ते' हा चित्रपट विविध महोत्सवांमध्येही दाखवला गेला आहे. अभिनेता उपेंद्र लिमये, छाया कदम यांच्यासह रिचा अग्निहोत्री, साईंकित कामत, पद्मनाभ बिंड, मंगल केंकरे, वंदना वाकनीस, सुदेश म्हशीलकर, रमेश चांदणे, सिद्धीरुपा करमरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

SCROLL FOR NEXT