The Kerala Stori Is Tax Free In Uttar Pradesh
The Kerala Stori Is Tax Free In Uttar Pradesh Saam TV
मनोरंजन बातम्या

The Kerala Story उत्तर प्रदेशमध्ये Tax Free; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा

Pooja Dange

The Kerala Stori Is Tax Free In Uttar Pradesh: 'द केरला स्टोरी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच चित्रपटावरून वाद होण्यास सुरुवात झाली. या चित्रपटाला दक्षिण भारतात जोरदार विरोध होत असताना भागात या चित्रपटाला पाठिंबा देण्यात येत आहे. आता या चित्रपटाला टॅक्स फ्री करण्याचा निर्णय देखील काही राज्य घेतनाला दिसत आहेत.

उत्तर प्रदेशच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये योगी आदित्यनाथ यांनी 'द केरला स्टोरी' हा चित्रपट उत्तर प्रदेशमध्ये टॅक्स फ्री केला असल्याचे सांगितले आहे. लव्ह जिहाद्यांवर आधारित या चित्रपटाला अनेक हिंदू संघटना पाठिंबा देत आहेत. (Latest Entertainment News)

'द केरला स्टोरी' हा चित्रपट ३ मुलींवर आधारित आहे. ज्यांचे मत परिवर्तन करून धर्मांतर करण्यात आले. त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर त्यांना आयएस या दहशतवादी संघटनेत सहभागी करण्यात आले.

या चित्रपटामध्ये सुरुवातीला ३२००० मुलींची कथा दाखविण्यात अली होती. परंतु हा आकडा खूप मोठा असल्याने त्याला विरोध झाला त्यानंतर या चित्रपटाची कथा ३ मुलींवर आधारित करण्यात आले.

दक्षिण भारतात या चित्रपटाला होणार मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. अनेक ठिकाणी हा चित्रपट दाखविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसेंदिवस वाढत आहे.

या चित्रपटाने रविवारी १६ करोडचे कलेक्शन केले आहे. तर या चित्रपटाने चार दिवसात ३५.२५ करोडचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.

या चित्रपटाला विरोध होत असताना अनेक हिंदू संघटनांनी या चित्रपटाला समर्थन दिले आहे. तर अभिनेते शरद पोंक्षे आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी देखील चित्रपटाला पाठिंबा दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic Jam: जाणवली ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक राेखली, वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

Ghatkopar Hording Collapse: धक्कादायक! घाटकोपर दुर्घटनेतील इगो मीडिया कंपनीचे दादरमध्ये ८ अनधिकृत होर्डिंग्स; पालिकेचा कारवाईचा इशारा

Lady Finger Benefits: गंभीर आजार होतील छू मंतर; भेंडी खाण्याचे जबरदस्त फायदे

Today's Marathi News Live: पुण्यात तिसऱ्या दिवशी हत्येची घटना, डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

Engagement Ring Designs : साखरपुड्यासाठी लेटेस्ट रिंग डिझाइन

SCROLL FOR NEXT