Manisha Rani Kisses Abdu Rozik Saam TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 2 Update : बिग बॉसच्या घरातील किसचा किस्सा संपेना... मनीषा राणीने अब्दुसोबत केलेल्या कृत्याने नेटकरी संतापले

Pooja Dange

Manisha Rani Get Trolled : सलमान खानच्या रिअॅलिटी शो 'बिग बॉस ओटीटी सीझन 2'मधील किसचा किस्सा काही केली संपत नाहीये. एका टास्कमध्ये आकांक्षा पुरी आणि जद हदीद यांनी एकमेकांना लिप लॉक करत किस केले, ज्यामुळे बराच गोंधळ झाला.

आता अशीच दुसरी घटना घरात घडली आहे. अब्दु रोजिकसोबत घडलेली ही घटना मनिषा राणीने केली होती. यानंतर सोशल मीडियावर अब्दूचे चाहते मनीषावर टीका करत आहेत. अब्दू आणि मनीषा यांच्यात काय घडले ज्यामुळे प्रेक्षक इतके संतापले आहेत.

बिग बॉस OTT 2 नवीन भागात मनीषा राणी एका टास्क दरम्यान अब्दू रोजिकला जबरदस्तीने किस करत असल्याचे दिसत आहे. अब्दू या शोमध्ये पाहुणे म्हणून सहभागी झाला होता.

घरातून बाहेर पडण्यापूर्वी, त्याला बिग बॉसने चार नॉमिनेटेड स्पर्धकांसह एक छोटासा डान्स व्हिडिओ शूट करण्यास सांगितले. या टास्कदरम्यान मनिषाने अब्दूला अनेक वेळा किस केले. अब्दुला खूप अस्वस्थ वाटत होते.

बिग बॉसने अब्दू रोजिकला एक टास्क दिला. त्याने घरातून बाहेर पडण्यापूर्वी चार नॉमिनेटेड सदस्यांसोबत व्हिडिओ शूट करावा. अब्दूने या कामासाठी जद हदीद, मनीषा राणी, अविनाश सचदेव आणि जिया शंकर यांची निवड केली.

तो जॅकुझीमध्ये मनिषासोबत व्हिडिओ शूट करत होता. दोघेही नाचत, पोज देत होते. दरम्यान, मनीषा जबरदस्तीने त्याला किस करण्याचा प्रयत्न केला. तिने अब्दूला गालावर किस करण्यास सांगितले, पण यादरम्यान अब्दू तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि स्वतः चा चेहरा तिच्यापासून दूर केला.

व्हिडिओ झाल्यानंतर अब्दू रोजिक मनीषा राणीपासून लांब गेला. तो म्हणतो, 'बिग बॉस, माझं काम झालं'. मग तो हसतो आणि प्रत्येकाला सांगतो की त्याची इच्छा आहे की त्याने दुसऱ्या कोणाची तरी निवड करावी. दुसरीकडे जिया आणि अविनाश देखील या घटनेची चर्चा करतात. अब्दू अस्वस्थ दिसत होता, तर मनिषाने जबरदस्तीने त्याचे किस करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा हात धरला.

मनीषाने अब्दूसोबत जे काही केले ते पाहिल्यानंतर चाहते मनीषावर नाराज असल्याचे दिसत आहे. एका यूजरने लिहिले की, 'मनीषा राणीने फुटेजसाठी हे केले आणि सर्व सीमा पार ओलांडल्या आहेत.

अब्दुला खूप अस्वस्थ वाटत होतं, पण ती किस करत राहिली. दुसऱ्या युजरने ट्विट केले की, "ती भाग्यवान आहे अब्दू रोजिकने तिला कानाखाली मारली नाही किंवा ढकललं नाही." अब्दूने तसे केले असते तर तिची कारकीर्द संपली असती.

उर्फी जावेदनेही या घटनेवर प्रतिक्रिया देत मनीषावर सडकून टीका केली आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिले की, 'हे पाहून मला खूप अस्वस्थ वाटले. ती त्याला जबरदस्तीने का किस करत होती? तो लहान मुलगा नाहीय.

आकांक्षा पुरी बाहेर काढल्यानंतर, पूजा भट आणि अभिषेक मल्हान वगळता संपूर्ण घर या आठवड्यात नामांकित झाले. यामध्ये सायरस ब्रोचा, जद हदीद, फलक नाझ, अविनाश सचदेव, मनीषा राणी, बेबीका ध्रुव आणि जिया शंकर यांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! एका झटक्यात मोडला हरभजन सिंगचा मोठा रेकॉर्ड

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

Pune CCTV Footage : रस्ता खचला, पुणे पालिकेचा ट्रक खड्ड्यात गाडला गेला; थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT