IPC saam tv
मनोरंजन बातम्या

अल्ट्रा झकास Original ची पहिली सिरीज ‘IPC’ २५ ऑक्टोबरपासून OTT वर

IPC Web Series: बहुप्रतिक्षीत IPC ही वेब सिरीज २५ ऑक्टोबरला प्रदर्शित केली जाणार आहे.

Saam Tv

अल्ट्रा झकास ओटीटीची पहिली मराठी ओरिजिनल वेब सिरीज ‘IPC’ २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘IPC’ ही वेब सिरीज प्रेक्षकांची पसंतीची ठरणार आहे. कारण ही क्राईम, थ्रिलरने परिपूर्ण असलेली ही वेबसिरीज सत्य घटनांवर आधारीत आहे. यासह अल्ट्रा झकास ओटीटीवर दर महिन्याला नवी कोरी वेब सिरीज रिलीज केली जाणार आहे.

या वेब सिरीजमध्ये प्रेक्षकांना देविका दफ्तरदार, किशोर कदम, सुरेश विश्वकर्मा, राजेंद्र शिसातकर व अभिनय सावंत यांसारख्या दिग्गज मंडळींच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवायला मिळेल.

कोकणातील एका छोट्यशा गावात शिमगोस्तव सुरु असतो, त्यावेळी गावातील २० वर्षीय तरुणीवर अत्याचार होतो. इथूनच सुरु होते, एक रहस्यमय कथा. ही कथा कल्पनेच्या पलीकडील सत्य वास्तवात घेऊन येते. ही वेबसिरीज २५ ऑक्टोबरला प्रदर्शित केली जाणार आहे.

ही कथा पडद्यावर उतरवण्यासाठी अनेक दिग्गज मंडळींनी मेहनत घेतली आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे राजेश चव्हाण हे या वेबसिरीजचे दिग्दर्शक आहेत. यासह अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ, सुशीलकुमार अग्रवाल हे या सिरीजचे निर्माते आहेत.

अल्ट्रा झकास मराठी OTT वर प्रदर्शित होणारी IPC ही पहिली वेबसिरीज असणार आहे. ही वेबसिरीज तुम्हाला जगभरात कुठेही पाहता येणार आहे . यासह या OTTH प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला एक नवी वेब सिरीज प्रदर्शित केली जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच वेगळ्या प्रकारच्या कथा अनुभवायला मिळणार आहे.'

तसेत IPC या मराठी वेब सिरीजचे दिग्दर्शक राजेश चव्हाण म्हणाले की, ' मी खरंच अल्ट्रा झकास मराठी ओटीटीचे आभार मानतो की, त्यांनी मला ही वेबसिरीज दिग्दर्शन करण्याची संधी दिली. ही वेब सिरीज दिग्दर्शित करण्याचा अनुभव फार वेगळा होता.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MVA Seat Sharing : महाराष्ट्रात मोठा भाऊ काँग्रेस, महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा मिळाल्या?

Maharashtra Election: पुण्यात आधी खोके सापडले, आता पेट्या; नाकाबंदीवेळी कारमधून लाखोंची कॅश जप्त, पोलिसांची धडक कारवाई

Maharashtra Election : शेकापचे ५ उमेदवार जाहीर, 'मविआ'बद्दलच्या चर्चांना पूर्णविराम, जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

Maharashtra Election : महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला? कोणतं सरकार चांगलं? सकाळ-CSDCचं सर्वेक्षण वाचा क्लिकवर

Winter Places: थंडगार हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांचे सौंदर्य फुलतं, नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT