Saam Tv
अभिताब बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अभिताब बच्चन यांचा आज ८२ वा वाढदिवस आहे.
अजुनही अभिताब बच्चन यांच्या अभिनयाला तोड देणारा अभिनेता हिंदी फिल्म इंडस्ट्रीत आला नाही.
अभिताब बच्चन यांनी आत्ता पर्यंत २०० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. चला तर त्यांच्या चित्रपटांना पुन्हा उजाला देवू.
पिकू हा चित्रपट ८ मे २०१५ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजुत सिरकर यांनी केले होते. यात बॉलिवूड स्टार दिपीका आणि अभिताब बच्चन यांची उत्तम केमिस्ट्री तुम्हाला पाहायला मिळू शकते.
अमिताभ बच्चन, फरहान अख्तर, अदिती राव हैदरी या बॉलिवूड अभिनेत्यांचा 'वजीर' चित्रपट तुम्ही पाहू शकता. हा चित्रपट तुम्ही सोनीलिव्हवर पाहू शकता.
डॉन हा 1978 मधील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता आणि त्याला बॉक्स ऑफिस इंडियाने 'गोल्डन ज्युबिली' म्हणून घोषित केले आहे. हा चित्रपट तुम्ही झी-५ वर पाहू शकता.
अमिताभ बच्चन आणि मीनाक्षी शेषाद्री यांनी गाजवलेला हा 'शहेनशाह' चित्रपट आहे. "रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, नाम है शहेनशाह" या वाक्याचे अजुनही बरेच चाहते आहेत. हा चित्रपट तुम्ही झी-५ वर पाहू शकता.
अमिताभ बच्चन, शशी कपूर आणि अभिनेत्री स्मिता पटेल यांनी १९८२ मध्ये हा सिनेसृष्टी गाजवून सोडली आहे. 'नमक हलाल' या चित्रपटात 'अर्जुनची' भुमिका अजुनही सगळ्यांच्या आवडीची आहे.