ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आलू टिक्की एक सोपी रेसिपी असून टिक्कीला सँडविच, बर्गर, स्ट्रीट फूड मध्ये वापरले जाते.
उकळलेले बटाटे,लाल मिरची पावडर, मीठ, लिंबूचा रस, तेल,चाट मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरेपूड, हळद, आमचूर पावडर,आले लसूण पेस्ट,कॅार्न प्लॅाअर इत्यादी
प्रथम एका बाउलमध्ये उकडलेले बटाटे घ्या. नंतर त्यात आले लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, जिरेपूड, आमचूर पावडर, हळद, लिंबूचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ अॅड करुन चांगले मिक्स करुन घ्या.
यानंतर एका भांड्यात आवश्यकतेनुसार कॉर्न फ्लॉअर घेऊन बटाट्याचे मिश्रण चांगले मिक्स करुन घ्या.
दुसऱ्या स्टेपमध्ये तयार केलेले सर्व मिश्रण पुन्हा एकदा चांगले एकजीव करुन घ्या.
त्यानंतर हाताला थोडे तेल लावून बटाट्याच्या मिश्रणाचे छोटे गोळे तयार करुन तळहातांनी टिक्कीचा आकार द्या. अशा प्रकारे संपूर्ण मिश्रणाची टिक्की तयार करुन प्लेटमध्ये ठेवून घ्या.
यानंतर गॅस ऑन करुन त्यावर कढई ठेवा. कढईमध्ये तेल टाकून तेल चांगले गरम झाल्यावर त्यात बटाट्याची टिक्की सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
अशा प्रकारे आपली झटपट बनणारी आलू टिक्की तयार झाली आहे. तुम्ही आलू टिक्कीला हिरवी चटणी किंवा चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करु शकता.
NEXT: वारंवार चेहऱ्यावर पिंपल्स येत आहेत? जाणून घ्या कारण