Udit Narayan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Udit Narayan : महिला फॅनला लिप किस केल्यानंतर उदित नारायण स्पष्टच म्हणाले...

Udit Narayan Clarification Kiss Controversy: सध्या सोशल मीडियावर गायक उदित नारायण यांनी लाइव्ह शोमध्ये फॅनला लिप किस केल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यावर आता उदित नारायण यांनी आपले मत मांडले आहे.

Shreya Maskar

सुप्रसिद्ध गायक उदित नारायण (Udit Narayan) कायमच आपल्या आवाजाने प्रेक्षकांना घायाळ करतात. आजवर त्यांनी अनेक हिट गाणी गायली आहेत. नेहमी आपल्या गाण्यांमुळे चर्चेत असलेले उदित नारायण आता एका वेगळ्याचे गोष्टीमुळे चर्चेत आले आहे. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उदित नारायण यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ते एका महिला चाहतीला लिप किस करताना दिसत आहे.

गायक उदित नारायण यांनी लाइव्ह शोमध्ये सेल्फी काढताना महिला चाहतीला किस केले आहे. यामुळे उदित नारायण यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. मात्र आता यावर उदित नारायण यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. एका मिडिया मुलाखतीत त्यांनी सांगितले की, "चाहते खूप वेडे असतात. मी सभ्य माणूस आहे. काही लोक अशा गोष्टी करून आपले प्रेम व्यक्त करतात. मग आता ही गोष्ट व्हायरल करून काय मिळणार आहे? गर्दी खूप असते. चाहत्यांना नेहमी कलाकारांना भेटण्याची इच्छा असते आणि जेव्हा ती संधी मिळते तेव्हा काही हात मिळवण्याचा प्रयत्न करतात, तर काही हाताला किस करतात. हे चाहत्यांचे प्रेम आहे. याकडे लक्ष देऊ नये."

पुढे उदित नारायण म्हणाले की," मी गातो तेव्हा चाहत्यांना खूप आनंद होतो. माझ्या कुटुंबाची प्रतिमा चांगली असल्यामुळे अनेक वेळा काहींना वाटते की वाद व्हावा. आदित्य शांत स्वभावाचा आहे आणि तो वादात सापडत नाही. माझ्या कार्यक्रमात सर्वांना आनंदी ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. "

शेवटी उदित नारायण म्हणाले की, ते अचानक घडले. मला बॉलिवूडमध्ये ४६ वर्षे झाली आहेत. माझी प्रतिमा अशी नाही. माझ्या चाहत्यांचे प्रेम पाहून मी हात जोडतो आणि नतमस्तक होतो. " असे बोलून उदित नारायण यांनी आपले मत मांडले आहे. उदित नारायण यांच्या स्पष्टीकरणावरही अनेक चांगली-वाईट मते नेटकऱ्यांकडून येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thick And Natural Eyebrows Tips: जाड आयब्रोज हवेत? मग पार्लरला जाण्यापूर्वी 'या' 5 घरगुती टिप्स नक्की ट्राय करा; ७ दिवसांत दिसेल मोठा फरक!

Maharashtra Live News Update: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये; पत्रकार परिषद घेणार

Ikkis OTT Release : धर्मेंद्र यांचा 'इक्कीस' चित्रपट ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार?

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं! १० तोळ्यामागे ११,४०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Maharashtra Politics: पिंपरीत एबी फॉर्मवरून गोंधळ, २ पक्षांचा एक उमेदवार, निवडणूक अधिकारी बुचकळ्यात

SCROLL FOR NEXT