Bigg Boss 17 Saam TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: 'बिग बॉस १७'चा पहिला विकेंडचा वॉर, सलमान खान आज स्पर्धकांची घेणार शाळा

Salman Khan: बिग बॉसच्या या सीझनला धमाकेदार सुरूवात झाली खरी पण घरामध्ये एन्ट्री घेताच अनेक कंटेस्टंटनी भांडण करायला सुरूवात केली.

Priya More

Bigg Boss 17 Weekend ka War: छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो 'बिग बॉस'चा १७ वा सीझनला (Big Boss 17) १५ ऑक्टोबरपासून म्हणजे रविवारी सुरूवात झाली. बिग बॉसच्या या सीझनला धमाकेदार सुरूवात झाली खरी पण घरामध्ये एन्ट्री घेताच अनेक कंटेस्टंटनी भांडण करायला सुरूवात केली.

अभिषेक आणि ईशा यांच्यातील भांडणासोबतच मुनावर फारुकी आणि खानजादी यांच्यातील वादही सर्वाधिक चर्चेत आहे. हे सर्व कंटेस्टंटनी एकमेकांना धमक्या देत अंगावर देखील धावून गेल्याचे चित्र या आठवड्यामध्ये पाहायला मिळाले.

तर दुसरीकडे बिग बॉसच्या घरामध्ये आलेल्या दोन कपलमध्ये रूसवे-फुगवे देखील पाहायला मिळाले. विकी जैन आणि अंकिता लोखंडेचा भावनिक स्पर्श प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला. आता बिग बॉसचा पहिला आठवडा संपणार आहे आणि पहिल्या वीकेंडचा वॉर सलमान खानसोबत होणार आहे. विकेंडच्या वॉरकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. आज सलमान खान अनेक कंटेस्टंटची शाळा घेणार असल्याचे दिसत आहे. यावेळी सलमान खान कोण-कोणत्या कंटेस्टंटवर रागवणार आहे हे आज संध्याकाळी कळेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'उडियान' फेम अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय यांच्यातील भांडण आणि लव्ह अँगल ड्रामा पाहता या वीकेंड का वारमध्ये सलमान खानचे टार्गेट अभिषेक असणार असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाल्यास, अभिषेक कुमारचे वागणे लोकांच्या समजण्यापलीकडे आहे.त्यामुळे सलमान खान आज त्याची चांगलीच शाळा घेऊ शकतो. इतकेच नाही तर वीकेंड का वारमध्ये अभिषेक आणि ईशा यांच्यातील भांडणावर सलमान खान बोलू शकतो.

दुसरीकडे, 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेतील सुपरहिट कपल आणि रिअल लाईफ कपल नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा सध्या मिर्ची-मसाला शोमध्ये काही खास देऊ शकत नाहीत. त्यामुळे या वीकेंडला सलमान नीलला चांगलेच झापण्याची शक्यता आहे. एकीकडे नील भट्ट पत्नी ऐश्वर्याला समजावण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे ऐश्वर्या नैराश्येत असल्याचे चित्र या आठवड्यामध्ये दिसून आले. तर सलमान खान आज अंकिताचा पती विकी जैनला सल्ला देखील देणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT