Bigg Boss 17 Premiere Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17 Premiere: 'बिग बॉस १७' च्या ग्रँड प्रीमियरचे काऊंट डाऊन सुरू; कधी, कुठं आणि कसं पाहता येणार?

Salman Khan Show Bigg Boss: आज या शोचा ग्रँड प्रीमियर पार पडणार असून यामध्ये सलमान खानचा स्वॅग पाहायला मिळणार आहे.

Priya More

Bigg Boss 17:

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आजपासून प्रत्येक टिव्हीवर बिग बॉसचा आवाज सर्वांना ऐकायला मिळेल.

बॉलिवूडचा 'सुलतान' अर्थात सलमान खान (Salman Khan) दरवर्षीप्रमाणे हा शो होस्ट करणार आहे. आज या शोचा ग्रँड प्रीमियर पार पडणार असून यामध्ये सलमान खानचा (Salman Khan Show) स्वॅग पाहायला मिळणार आहे.

'बिग बॉस 17'ची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांना या शोची आतुरता लागली होती आणि त्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे. हा शो 15 ऑक्टोबर म्हणजे आज रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या शोचा ग्रँड प्रीमियर पार पडणार आहे. या शोमध्ये कोण-कोणते कलाकार पाहायला मिळणार हे आज समजेल. हा शो कधी, कुठे आणि कसं पाहता येणार हे आज आपण जाणून घेणार आहोत...

बिग बॉस १७ चा ग्रँड प्रिमयर आज रात्री ९ वाजता कलर्स टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. त्याचसोबत जिओ सिनेमावर प्रेक्षकांना हा वादग्रस्त कार्यक्रम पाहता येईल. सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता आणि वीकेंडला म्हणजेच शनिवार-रविवारी रात्री 9 वाजता कलर्स आणि जिओ सिनेमावर हा कार्यक्रम पाहयला मिळेल. शनिवार आणि रविवारचा 'विकेंड का वार' होईल यामध्ये सलमान खान दिसेल. नेहमीप्रमाणे सलमान खान विकेंडला कंटेस्टनची शाळा घेताना दिसणार आहे. तसेच 24 तासांसाठी या शोचे लाईव्ह स्ट्रीमिंगदेखील होणार आहे ते तुम्हाला जिओ सिनेमावर पाहायला मिळेल.

बिग बॉसमध्ये कोणते स्पर्धक दिसणार हे आज रात्री शोच्या भव्य प्रीमियरमध्ये कळेल. बिग बॉसच्या घरामध्ये येणाऱ्या काही स्पर्धकांच्या नावाची चर्चा होती. त्याचसोबत काही सेलिब्रिटींचे प्रोमो देखील आले पण त्यांचे चेहरे दाखवण्यात आले नव्हते.

पण रिपोर्ट्सनुसार, यावेळी या शोमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन, ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट, ईशा मालवीय, मुनावर फारुकी, अनुराग डोवाल, मन्नारा चोप्रा, जिग्ना व्होरा, कंवर धिल्लन, एल्विश यादवची एक्स गर्लफ्रेंड कीर्ती मेहरा, फैज बलोच हे सेलिब्रिटी दिसणार आहेत. सनी आर्या, मनस्वी ममगाई, रिंकू धवन, अरमान मलिक, कृतिका/पायल मलिक, जय सोनी आणि संदीप सिकंद हे सेलिब्रिटी दिसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदान केंद्राबाहेर छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी|VIDEO

Maharashtra Nagar Parishad Live : मनमाड शहरात मोठा राडा, भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले

Wedding Varat Ritual: लग्नानंतर नवरा आणि नवरीची वरात का काढतात?

Sangli: पाटलांच्या समर्थकांचा राडा, मतदान केंद्राबाहेर भाजप- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; VIDEO व्हायरल

Nagar Parishad Update : ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची शक्यता; स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या निकालाबाबत ईव्हीएम हटाव सेनेचा संताप

SCROLL FOR NEXT