Tejasswi Prakash Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tejasswi Prakash: टीव्हीच्या 'नागिन'ने दिवाळी पार्टीत लावला ग्लॅमरसचा तडका, ब्लॅक साडीत तेजस्वी प्रकाशचा किलर लूक

Tejasswi Prakash Stylish Look: नुकताच लाइफस्टाइल एशियाने दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

Priya More

Tejasswi Prakash Photoshoot:

दिवाळी सणाला (Diwali 2023) आजपासून सुरूवात झाली. मनोरंजनसृष्टीमध्ये सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटी दिवाळी पार्टीचे आयोजन करत आहे. या पार्टीमध्ये बॉलिवूडपासून (Bollywood) ते टीव्ही इंडस्ट्रीचे सर्वच सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसत आहेत. आपल्या नवनवीन ड्रेसिंग स्टाईल आणि सौंदर्याद्वारे ते या पार्टीमध्ये ग्लॅमरसचा तडका देत आहेत.

नुकताच लाइफस्टाइल एशियाने दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या पार्टीला टीव्हीची 'नागिन' अर्थात अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने जबरदस्त अंदाजमध्ये हजेरी लावली.

लाइफस्टाइल एशियाच्या दिवाळी पार्टीमध्ये तेजस्वी प्रकाश ब्लॅक साडी आणि मल्टी कलर ब्लालेट डिझायनर ब्लाऊज परिधान करून आली होती. या साडीमध्ये तेजस्वी खूपच सुंदर दिसत होती. या पार्टीला तेजस्वीने एन्ट्री करताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. यावेळी तेजस्वीने पापाराझींना जबरदस्त पोझ देत फोटोशूट केले. तेजस्वीने स्माइल देत एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या. तेजस्वी प्रकाशचे हे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तेजस्वीने आपला लूक खूपच सिंपल ठेवला आहे. तिने आपले केस मोकळे सोडत लाईट मेकअप केला आहे. ती या लूकमध्ये खूपच हॉट दिसत आहे. तेजस्वी प्रकाशचे फोटो सोशल मीडियावर अवघ्या काही मिनिटांमध्येच व्हायरल झाले. तिच्या या फोटो आणि व्हिडीओमुळे सोशल मीडियाचा पारा चांगलाच वाढला आहे. या फोटो आणि व्हिडीओला तेजस्वीच्या चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत असून ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. या फोटोंवरून तेजस्वीच्या चाहत्यांच्या नजरा हटत नाहीयेत.

तेजस्वी व्यतिरिक्त मौनी रॉय, दिशा पाटनी, सुरवीन चावला, नुसरत भरूच्चासह अनेक अभिनेत्रींनी या दिवाळी पार्टीला हजेरी लावली. या पार्टीमध्ये उपस्थित राहिलेल्या सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या फोटो आणि व्हिडीओला त्यांच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT