Televison Actress Snehal Rai Meets With Car Accident Saam Tv
मनोरंजन बातम्या

Snehal Rai Accident: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारला मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात, गाडीचा अक्षरश: चक्काचूर...

Actress Snehal Rai Injured Car Accident On Mumbai-Pune Highway: ‘इश्क का रंग सफेद’ फेम लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री स्नेहल राय हिचा पुण्याला जात असतातना, अपघात झाला आहे.

Chetan Bodke

Televison Actress Snehal Rai Meets With Car Accident: ‘इश्क का रंग सफेद’ फेम लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री स्नेहल राय हिचा पुण्याला जात असतातना, अपघात झाला आहे. अभिनेत्रीच्या कारला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे तिच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण महत्वाची बाब म्हणजे, ड्रायव्हरने आपला संयम अजिबात गमावला नाही. ड्रायव्हरने आपल्या परीने जीव वाचवता येईल असा प्रयत्न करत होता. त्यामुळे अभिनेत्री थोडक्यातच बचावली आहे. घटनेत कोणीही गंभीर जखमी झालेलं नाही.

एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेत गाडीतील कोणतीच व्यक्ती गंभीर जखमी झालेले नाही. गाडीच्या चालकाला आणि अभिनेत्रीला गाडीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. गाडीचे भरपूर नुकसान झाल्याने अभिनेत्रीने ट्रक मालकाकडे भरपाई मागितली असता, त्याने नकार दिला. तसेच त्या ट्रक ड्रायव्हरने अभिनेत्रीला धमकी दिली असून तो घटनास्थळावरून गायब झाला आहे. त्यानंतर अभिनेत्रीने तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात फोन केला असू पोलीस घटनास्थळी पोहोचले.

'इ- टाईम्स'शी संवाद साधताना स्नेहल राय म्हणाली, “माझ्यासोबत कोणती घटना घडली हे मला अजूनही समजू शकलेलं नाही. अचानक मागून येऊन एका ट्रकने माझ्या कारला धडक दिली. पण माझा जीव वाचवणाऱ्या ड्रायव्हरचे मी मनापासून आभार मानते. आम्ही पोलिस स्टेशनला आमचा अपघात झाल्याची माहिती दिली असता घटनास्थळी पोलिस 5-10 मिनिटांतच पोहोचले. बोरघाट पोलीस स्टेशनचे योगेश भोसले सर यांचे मी आभारी आहे. त्यांनी मला खूप मदत केली. मला काय होईल याची काळजी वाटत होती आणि त्यांनी आम्हाला ग्लुकोज आणि त्या वेळी जे काही आवश्यक होते ते दिले.”

पुढे स्नेहल म्हणते, “पोलीस वेळेवर येत नाहीत असे लोक का म्हणतात? या प्रश्नंच मला खरंतर कळलेला नाही. मी जेव्हा वाईट काळात होते, त्यावेळी ते घटनास्थळी आले आणि आवश्यक ती त्यांनी मला मदत केली. ट्रक ड्रायव्हर पळून गेल्याने आणि त्याच्या वाहनाबद्दल कोणतीही माहिती नसल्याने एफआयआर नोंदवता आला नाही. घटनेनंतर मला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथे मलमपट्टी करण्यात आली.” अभिनेत्रीच्या कारचा ट्रकचा धडकेत जरी चक्काचूर झाले असला तरी, अभिनेत्री या अपघातातून वाचली, ही महत्वाची बाब आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Self Reflection : जाता-येता आरशात स्वत:ला बघणारी व्यक्ती नक्की काय विचार करते? काय आहे त्यामागील मानसशास्त्र

७५ जिल्ह्यांत अचानक बत्ती गुल अन् सायरनचा टँव टँव आवाज; राज्यात खळबळ, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: विरोधकांना विदेशातून मोठी आर्थिक ताकद…मंत्री विखे यांचा मोठा आरोप

Zunka Bhakri Recipe: थंडीत रात्री जेवणासाठी करा खमंग स्वादिष्ट झुणका-भाकर, वाचा आजीची खास रेसिपी

'गरीब की बीवी सबकी भाभी...; वादग्रस्त विधानामुळे मनपा महासभेत राडा, ठाकरे गटाच्या नगरसेवकाला सभागृहाबाहेर काढलं!

SCROLL FOR NEXT