tv actress shruthi attacked by her husband x
मनोरंजन बातम्या

Actress : काही दिवसांपूर्वीच नवऱ्याच्या घरी परतली, मुलं घराबाहेर गेल्यानंतर अभिनेत्रीवर जीवघेणा हल्ला

Actress News : प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना माहिती समोर आली आहे. अभिनेत्रीवर तिच्याच पतीने हल्ला केल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Yash Shirke

Entertainment News : मनोरंजनविश्वातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीवर तिच्या पतीने चाकूने हल्ला केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अभिनेत्रीच्या पतीवर गुन्हा दाखल करत पुढील कारवाई केली आहे. पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपांखाली अभिनेत्रीच्या पतीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड टेलिव्हिजन अभिनेत्री श्रुती (जिचे मूळ नाव मंजुला आहे) हीच्यावर पती अमरीशने जीवघेणा हल्ला केला. ५ जुलै रोजी श्रुतीवर बंगळुरूमधील राहत्या घरी हल्ला झाला. आठवडाभराने ही घटना समोर आली आहे. आर्थिक समस्या आणि वैवाहिक स्थितीवरुन श्रुती आणि तिचा पती अमरीश यांच्यातील संबंध मागील काही महिन्यांपासून ताणले होते. दोघांनी एकमेकांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती.

सततच्या वादाला कंटाळून श्रुती एप्रिल महिन्यामध्ये तिच्या भावाच्या घरी राहायला गेली. त्यानंतर दोघांना तडजोड होऊन मागच्या आठवड्यात त्यांनी समेट केला. यादरम्यान श्रुतीवर अमरीशने प्राणघातक हल्ला केला. त्यांची मुले कॉलेजला गेल्यावर अमरीशने डाव साधला. अमरीशने श्रुतीच्या चेहऱ्यावर पेपर स्प्रे मारला आणि तिच्यावर चाकूने वार केले.

अमरिशने श्रुतीच्या मानेवर, छातीवर आणि मांडीवर चाकूने अनेकदा वार केले. यामुळे श्रुतीला गंभीर दुखापत झाली. अमरिशने श्रुतीचे केस ओढले आणि तिचे डोके भिंतीवर आपटले अशी माहिती समोर आली आहे. श्रुती सध्या बंगळुरूच्या व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिने अमरीशवर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. घरगुती हिंसा होत असल्याचेही श्रुतीने म्हटले आहे.

पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी हनुमंतनगर पोलिसांनी अमरिशच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा सविस्तर तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अभिनेत्री श्रुतीवर झालेल्या हल्ल्यामुळे सिनेसृष्टीमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT