Nehalaxmi Iyer SAAM TV
मनोरंजन बातम्या

Nehalaxmi Iyer : स्वप्नपूर्ती! टीव्ही अभिनेत्रीनं मुंबईत घेतलं आलिशान घर, पाहा Inside Photo

Nehalaxmi Iyer New Home : टिव्ही अभिनेत्री नेहा लक्ष्मीने नुकतेच आलिशान घर खरेदी केले आहे. गृहप्रवेशचे सुंदर फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Shreya Maskar

टिव्ही अभिनेत्री नेहा लक्ष्मीने (Nehalaxmi Iyer) नुकतीच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने आपल्या नवीन आयुष्याला सुरूवात केली आहे. नेहा लक्ष्मी हिंदी मालिका 'इश्कबाज' आणि 'कुबूल है' मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली आहे. नुकतेच नेहा लक्ष्मीने मुंबईत आलिशान घर खरेदी केले आहे. नवीन घराच्या गृहप्रवेशचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

नेहा लक्ष्मीने शेअर केलेल्या या फोटो आणि व्हिडीओमधून तिच्या घराची झलक देखील पाहायला मिळत आहे. या पोस्टला तिने खूप हटके कॅप्शन दिलं आहे. तिच्या या पोस्टवर तिचे कलाकार मित्रमंडळी आणि चाहत्यांकडून कमेंट्स, लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नेहा लक्ष्मी फोटोमधून खूप सुंदर दिसत आहे.

नेहा लक्ष्मी पोस्ट

"नवीन सुरुवात... पवित्र विधी...कृतज्ञता...

आम्ही अखेर इतके दिवस जपलेल्या स्वप्नात पाऊल ठेवले-आमचे नवीन घर...आनंदाने भरलेले हृदय आणि प्रार्थनेत हात जोडतो...आमच्या घराची वास्तु शांती पूजा... या पवित्र जागेचा प्रत्येक कोपऱ्यात दैवी आशीर्वाद, शांती आणि सकारात्मक उर्जेची निवास असेल. या शुभ प्रसंगी मी पारंपारिक हिरवी कांजीवरम रेशमी साडी आणि महाराष्ट्रीयन नाथ परिधान केली...कारण जेव्हा तुमच्या घरात शुभ कार्य घडत असते तेव्हा आपली संस्कृती, विधी आणि वारशाची समृद्धता स्वीकारण्यावर मी विश्वास ठेवते... ही भावना शब्दांच्या पलीकडची आहे. आमच्यासाठी हे फक्त एक घर नाही... ही आमच्या नवीन जीवनाची सुरुवात आहे...हे घर हेतू, प्रेम, परंपरा आणि स्वप्नांनी बांधले गेले आहे. येथे हास्य, चांगली ऊर्जा आणि अर्थपूर्ण आठवणींनी भरलेले जीवन घडवायचे आहे..."

नेहा लक्ष्मी वर्कफ्रंट

अभिनेत्री नेहा लक्ष्मीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.तिने 'इश्कबाज' ,'कुबूल है','ससुराल सिमर', 'ना आना इस देस लाडो', 'कृष्णाबेन खाखरवाला' आणि 'दिल बोले ओबेरॉय' अशा मालिकांमध्ये काम केले आहे. नेहा लक्ष्मी आणि रुद्रेश जोशी यांनी 2024 मध्ये लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या एका वर्षांनी त्यांनी स्वतःचे घर खरेदी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT