TV Actress Blame Her Co-Actor
TV Actress Blame Her Co-Actor saam tv
मनोरंजन बातम्या

TV Actress Blame Her Co-Actor: लग्नाचे वचन दिले आणि... टीव्ही अभिनेत्रीचा सहकलाकारावर गंभीर आरोप

Pooja Dange

TV Actress File Complaint Against Co-Actor: टीव्ही जगतातील एक धक्कादायक बातमी समजली आहे. छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने तिच्या सहकलाकारावर बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. अभिनेत्रीने सहकलाकाराच्या विरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. अभिनेत्रीने एका हिंदी वृत्त वाहिनीशी संवाद साधताना याचा खुलासा केला आहे.

या अभिनेत्रीने को-स्टारवर लग्नाचे कारण सांगून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. गोरेगाव येथे राहणाऱ्या या अभिनेत्रीने सांगितले की, सहकलाकाराने खोटे बोलून तिच्याकडून पैसे घेतले. अनेक टीव्ही शो आणि वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीने सांगितले की, दोघेही 9 महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. एकत्र काम करत असताना त्यांची आधी मैत्री झाली आणि नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

अभिनेत्री म्हणाली, “आमच्यामध्ये सर्व काही उत्तम चालले होते. एके दिवशी मला वाटले की कदाचित त्याचे दुस-या स्त्रीशी संबंध आहेत. यानंतर मी दोघांशी याबाबत बोलले आणि दोघांनीही ते फक्त मित्र आहोत असे सांगून त्यांनी नाते नाकारले. अभिनेत्याची (आरोपी सह-कलाकार) आजी मरण पावली, त्यामुळे तो अस्वस्थ झाला.

अभिनेत्रीने पुढे म्हणाली की अनेकवेळा सहकलाकाराने तिच्याकडे पैसे मागितले आहेत. अभिनेत्री म्हणाली, “अनेक वेळा त्याने माझ्याकडे पैसे मागितले होते, जे मी त्याला दिले होते. या घटनेनंतर मीही या विषयावर जास्त बोलले नाही. जेव्हा त्याचा (आरोपी अभिनेत्याचा) वाढदिवस होता, तेव्हा मी त्याच्या घरी गेलो होतो. त्यावेळी ती मुलगीही तिथे उपस्थित होती, त्यानंतर अचानक त्या मुलीने मला घर सोडण्यास सांगितले, हे ऐकून मला धक्काच बसला. कोणी मला माझ्या प्रियकराचे घर सोडून जाण्यास कसे सांगू शकते, तेही त्याच्या वाढदिवसाला.

अभिनेत्रीने असेही सांगितले की, “त्यानंतर दोघांनी माझी माफी मागितली आणि हे जेव्ह ती बोली तेव्हा ती मद्यधुंद अवस्थेत होती, असे त्यांनी सांगितले. मग मी ऐकले की को-स्टार आणि ती मुलगी एकाच घरात एकत्र राहतात. जेव्हा मी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी मला धमक्या देण्यास सुरुवात केली आणि मला कोणाला काही बोलू नकोस असे सांगितले.

अभिनेत्री म्हणाली, “जेव्हा मला हे सर्व माहित नव्हते, तेव्हा त्याने माझ्याशी लग्न करण्याचे वचन दिले आणि माझ्याशी संबंध ठेवले. जेव्हा सर्व काही कळले तेव्हा त्याने (आरोपी सह-कलाकार) सेटवरील लोकांसमोर माझ्याबद्दल वाईट बोलण्यास सुरुवात केली आणि माझ्या चारित्र्यावर शंका घेण्यास सुरुवात केली. यानंतर मी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली.

टीव्ही अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर, गोरेगाव पोलिसांनी आरोपी अभिनेत्याविरुद्ध आयपीसीच्या कलम ३७६(एन)(२), ३७७, ५०९ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Latest Entertainment News)

आरोपी अभिनेत्यानेही याप्रकरणी मौन तोडले असून अभिनेत्रीचे आरोप फेटाळून लावले आहेत. आरोपी अभिनेत्याचे वकील शैलेंद्र मिश्रा म्हणतात, “यापूर्वी अभिनेत्रीने केलेल्या आरोपांचा उल्लेख नव्हता. जेव्हा 25 मार्च 2023 रोजी अभिनेत्याने अभिनेत्रीविरुद्ध ब्लॅकमेलिंग आणि जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केल्याची एफआयआर दाखल केली, तेव्हा अभिनेत्रीने लेखी तक्रारीत 9 दिवसांनंतर पुन्हा बलात्काराचा आरोप केला.

अटक टाळण्यासाठी सहकलाकाराने दिंडोशी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, तो फेटाळण्यात आला. आता सहकलाकार उच्च न्यालयाकडे दाद मागणार आहे. आरोपी अभिनेत्याच्या वकिलाने सांगितले की, “आम्ही उच्च न्यायालयात जाऊ कारण अभिनेत्याला न्याय मिळाला पाहिजे. सर्व सोशल मीडिया संभाषणांचा तपस केला जाईल. अभिनेत्रीने फसवणुकीचे आरोपही केले आहेत.'

दोघांचे व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आल्याचे वकिलाचे म्हणणे आहे. अभिनेता निर्दोष सिद्ध होईल आणि अभिनेत्रीवर कारवाई केली जाईल. लग्नाच्या आश्वासनावर वकिलाने सांगितले की, “लग्नाच्या वचनाचा अद्याप सोशल मीडियावर उल्लेख करण्यात आलेला नाही.

मात्र, अभिनेत्याच्या वाढदिवशी अभिनेत्रीने त्याला आय लव्ह यू असा मेसेज पाठवला होता. यानंतर अभिनेत्याने तिला ब्लॉक केले. राहता राहिला प्रश्न पैश्याचा, अभिनेता तिला 1 लाख 80 हजार रुपये देणार आहे, परंतु 4 लाख रुपये द्यायचे असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. आम्ही लढत राहू, हार मानणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: अकोल्यात ट्रक आणि कारचा भीषण अपघात

Monsoon: खुशखबर! आज सायंकाळपर्यंत अंदमानमध्ये दाखल होणार मान्सून

Solapur News : दुष्काळामुळे सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग अडचणीत; शेतकरीही चिंतेत 

AC Tips: उन्हाळ्यात ऐसी वापरताय? सेटिंग करताना 'या' चूका टाळा नाहितर...

SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT