Naad The Hard Love Poster 
मनोरंजन बातम्या

Naad The Hard Love: ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड दिसणार अनोख्या भूमिकेत, ‘नाद’चा पोस्टर रिलीज

Naad Poster: छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ मालिकेतल्या मुख्य भूमिकेतून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Chetan Bodke

Naad The Hard Love Poster

छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ मालिकेतल्या मुख्य भूमिकेतून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच अभिनेत्याने गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत नव्या चित्रपटाचा पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. अभिनेत्याने या चित्रपटाची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वीच केलेली आहे. ‘नाद-द हार्ड लव्ह’ या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. (Marathi Actors)

या चित्रपटामध्ये किरणसोबत अनेक नवखे कलाकारही पाहायला मिळणार आहेत. एका लव्हस्टोरी आधारित चित्रपटाचे कथानक आहे. प्रेमकथेच्या जोडीला समाजात घडणाऱ्या घटनांवर प्रकाशझोत टाकणारं कथानक यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रिलीज करण्यात आलेल्या फर्स्ट लूकबाबत दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितले की, ‘नाद-द हार्ड लव्ह’ हा चित्रपट खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना खूप काही वेगळं देणारा आहे. ‘द हार्ड लव्ह’ ही टॅगलाईनच खूप काही सांगणारी आहे. (Marathi Film)

शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांची निर्मिती असलेल्या 'नाद - द हार्ड लव्ह' चित्रपटाचे निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर आहेत. आजवर 'मिथुन', 'रांजण', 'बलोच' अशा विविध विषयांवरील आव्हानात्मक चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. डॉ. विनायक पवार यांनी पटकथा व संवादलेखन केलं आहे. याखेरीज विनायक यांनी वैभव देशमुख यांच्यासोबत 'नाद'साठी गीतलेखनही केलं आहे. संगीतकार पंकज पडघन यांनी या गीतांना संगीत देण्याचं काम केलं आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Trendy Design: साडीपासून ते जिन्स टॉपवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी मंगळसूत्र डिझाईन्स, मिळेल ग्लॅमरस लूक

Maharashtra News Live Update: नवी मुंबईत एका सोसायटीमध्ये लिफ्टचा अपघात

एकाच रुळावर समोरासमोर आल्या दोन लोकल, चर्नी रोड स्थानकाजवळील घटना

बाबोss...पेन्शनचे ११०० रुपये काढायला बँकेत गेल्या, अकाउंटमध्ये ७४० कोटी; ४४० व्होल्टचा झटकाच बसला, रात्रभर झोप न लागल्यानं तब्येत बिघडली

Palghar Tourism : पाऊस, हिरवेगार जंगल , धबधबा अन् ट्रेक; वन डे ट्रिपसाठी बेस्ट आहे पालघरजवळील 'हे' लोकेशन

SCROLL FOR NEXT