Actor Karan Vohra Accident On Shooting Set Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Karan Vohra News : मालिकेच्या शूटिंगदरम्यान घडली मोठी घटना, आगीतून थोडक्यात बचावला अभिनेता; धक्कादायक Video व्हायरल

Actor Karan Vohra Accident On Shooting Set : सुप्रसिद्ध हिंदी टेलिव्हिजन अभिनेता करण वोहरा एका अपघातातून थोडक्यात बचावला आहे. मालिकेच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्याचा अपघात होता होता थोडक्यात बचावला आहे.

Chetan Bodke

सुप्रसिद्ध हिंदी टेलिव्हिजन अभिनेता करण वोहरा एका अपघातातून थोडक्यात बचावला आहे. ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवरील 'नाम नमक निशान' मालिकेच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्याचा अपघात होता होता थोडक्यात बचावला आहे. अपघात दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मालिकेच्या शुटिंग दरम्यानचा व्हिडिओ स्वत: करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला आहे. व्हिडिओमध्ये, करण गार्डन एरियामध्ये उभा असतो. त्याच्या समोर फायर ओव्हन दिसत आहे, त्याला त्या ओव्हनचे झाकण उघडायचा सीन असतो. शुटिंग दरम्यान त्या ओव्हनचं झाकण उघडायला जातो, तर तितक्यात त्याच्या अंगावर आगीचा भडका उडतो. पण सुदैवाने अभिनेत्याला काहीही होत नाही. तो सुखरूप आहे.

त्या फायर ओव्हनमधील आग करणच्या चेहऱ्यावर आणि कपड्यावर येते. पण तितक्यात तो त्या आगीतून पाठीमागे सरतो. घटना घडताच त्याच्या मदतीला अभिनेता वरूण सूद येतो. घटनेमुळे करणच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. पण अभिनेता सुदैवाने सुरक्षित आहे.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करणने घटनेचा व्हिडिओ "शेवटी वाचलो, वरूण सूद तूच ही घटना पाहिली." असं कॅप्शन देत शेअर केला. सेटवर घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून अनेक सेलिब्रिटी मित्रांसहित चाहत्यांनीही अभिनेत्याच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Maharashtra Fort : ५,१४१ फूट उंचीवर दिमाखात उभा आहे किल्ला, २-३ तासांचा थरार ट्रेक करून गाठता येतो माथा

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

SCROLL FOR NEXT