karan patel wife ankita bhargava Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Divorce: प्रसिद्ध अभिनेत्याच्या आयुष्यात वादळ, ११ वर्षांनंतर संसार मोडणार? बायकोने दिले संकेत

Actor Divorce: प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता करण पटेल लग्नाच्या 11 वर्षांनंतर घटस्फोट घेत असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहे. या चर्चांवर आता त्याची पत्नी अंकिताने मत व्यक्त केल आहे.

Shruti Vilas Kadam

Actor Divorce: ‘ये है मोहब्बते’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता करण पटेल सध्या त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर करण आणि त्याची पत्नी अंकिता भार्गव यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. इतकेच नव्हे तर त्यांच्या ११ वर्षांच्या संसाराला आता मोडणार असल्याचेही सोशल मीडियावर बोलले जात आहे.

मात्र, या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. अंकिता भार्गवने स्वतः पुढे येत या अफवा पूर्णपणे खोट्या असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘टेली मसाला’शी संवाद साधताना अंकिताने सांगितले की, “आम्ही दोघेही एकत्र खूप आनंदी आहोत. आमचे आयुष्य खूप शांत आणि सुखी सुरु आहे. सोशल मीडियावर काय चालते, याकडे मी फारसे लक्ष देत नाही.”

तिने पुढे सांगितले की, लग्नाला ११ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारच्या अफवा पसरवणे अत्यंत दुर्दैवी आहे. तिच्या मते, काही “कीबोर्ड वॉरियर्स” केवळ लक्ष वेधण्यासाठी अशा चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. “या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबात तथ्य नाही,” असेही तिने ठामपणे सांगितले.

गेल्या काही दिवसांत या कपलमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या पसरत होत्या. एका पॉडकास्टदरम्यान अंकिताने खुलासा केला की, त्यांच्या घटस्फोटाच्या अफवेबद्दल तिलाही एका मित्राकडून समजले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी वकिलांसोबत या गोष्टीवर चर्चा केल्याचेही व्हायरल झाले होते. अंकिताने आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगितली की, त्यांच्या जवळच्या व्यक्तींपैकीच कोणीतरी ही खोटी माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवली होती. यामुळे या अफवांना आणखी खतपाणी मिळाले.

दरम्यान, करण आणि अंकिता यांचा विवाह ३ मे २०१५ रोजी झाला होता. या कपलला मेहर नावाची एक मुलगी आहे. सध्या दोघेही आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी असून त्यांनी या अफवांकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Income Tax Rules: इन्कम टॅक्स भरणारांना मोठा दिलासा! ६०,००० रुपयांच्या टॅक्स रिबेटचा नवा नियम; जाणून घ्या कोणाचा फायदा होणार?

Maharashtra News Live Update : रस्त्यावर खडी टाकण्याच्या कारणावरून सांगोल्यात दांडक्याने मारहाण

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Deep Amavasya : दीप अमावस्येला गव्हाचे दिवेच का लावतात? जाणून घ्या यामागची श्रद्धा आणि परंपरा

Gen Alpha Club : नांदेडमध्ये रस्त्यांची दुरवस्था,साम टीव्हीच्या Gen Z रिपोर्टरने अशी केली पोलखोल

SCROLL FOR NEXT