Tusshar Kapoor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Tusshar Kapoor : तुषार कपूरचे फेसबुक अकाउंट हॅक, पोस्ट करत दिली चाहत्यांना माहिती

Tusshar Kapoor Facebook Account Hacked : बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरचे फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घ्या.

Shreya Maskar

अभिनेता तुषार कपूरने (Tusshar Kapoor) अनेक हिट चित्रपट केले आहेत. त्याची सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोइंग आहे. नुकतेच तुषारने आपल्या चाहत्यांसोबत एक बातमी शेअर केली आहे. तुषारचे पब्लिक आणि प्रायव्हेट फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे. ज्यामुळे तो काही काळ सोशल मीडियावर सक्रिय नसेल.

तुषार कपूरने पोस्ट करून सांगितले की, त्याची टीम फेसबुकचे अकाउंट पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. लवकरच माझ अकाउंट सुरळीत सुरू होईल. त्यांनी इंस्टाग्रामवर या बाबतची पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिलं की, "मी तुम्हाला सांगतो की माझे पब्लिक आणि प्रायव्हेट फेसबुक अकाउंट हॅक (Facebook Account Hacked) झाले आहे. त्याच्यासोबत कोणातरी छेडछाड केली आहे. ज्यामुळे मी सोशल मीडियावर सक्रिय नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी माझी टीम कार्यरत आहे. लवकरच तुमच्या सर्वांशी पुन्हा कनेक्ट होईन. तोवर तुमचा पाठिंबा असावा." अशी नोट त्यांनी लिहिली आहे.

तुषार कपूर लवकरच 'दस जून की रात' यामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'मुझे कुछ कहना है' हा तुषार कपूरचा पहिला चित्रपट खूप हिट झाला. त्यांनी अनेक कॉमेडी चित्रपट केले आहेत. त्याचा 'गोलमाल' आणि 'क्या कूल हैं हम' हे चित्रपट गाजले आहेत. तुषार कपूर हा ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा आहे. तसेच तुषार चित्रपटची निर्मिती देखील करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

SCROLL FOR NEXT