Tunisha Sharma And Sheezan Khan   Instagram @_tunisha.sharma_
मनोरंजन बातम्या

Sheezan Khan: टुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणाला नवे वळण, शीजानच्या वकिलांचा गौप्यस्फोट...

शीजान खानचे घराचे आणि वकील आज पत्रकार परिषद घेणार.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Press Conference Of Sheezan Khan Lawyer: अभिनेत्री टुनिशा शर्माने २४ डिसेंबर रोजी मालिकेच्या सेट तिचा सहकलाकार शीजान खानच्या मेकअप रूमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणाबाबत अनेक खुलासे झाले. आता शीजानच्या वकिलांनी मोठी माहिती दिली आहे. शीजानचे घराचे आणि वकील आज पत्रकार परिषद घेणार आहेत.

अभिनेत्री टुनिशा शर्माच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी शीजान खानच्या वकिलाने वसई सत्र न्यायालयात त्याच्या जामीनासाठी अर्ज केला आहे. 31 डिसेंबर रोजी वालीव पोलिसांनी केलेल्या मागणीनुसार वसई न्यायालयाने शीजान खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज ज्युनिअर वकिलांकडून शीजान खान याचा जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. (Actress)

आज अंधेरी येथे शीजानचे घरचे व वकील प्रेस कॉन्फरन्स घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार आहेत, असा दावा शीजानच्या वकिलाने केला आहे. टुनिशा शर्माच्या मृत्यूनंतर तिची आई आणि मामा यांनी पत्रकार परिषद घेऊन शीजानवर अनेक आरोप केले होते. तसेच शीजानसोबत रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर तिचे राहणीमान कसे बदलले होते हे देखील त्यांनी सांगितले होते.

टुनिशाच्या आईने केलेलं आरोप शीजानच्या कुटुंबियांनी फेटाळले आहेत. टुनिशाची मानसिकता गेल्या काही दिवसांपासून खराब होती. टुनिशाला तिच्या कुटुंबियांकडून त्रास होता असा दावा शीजानच्या कुटुंबियांनी केला आहे. टुनिशावर धर्मपरिवर्तन करण्याची दबाव टाकला जात होता तसेच हिजाब घालण्यासाची सक्ती केली जात होती असा दावा टुनिशाच्या आईने केला होता, शीजानच्या कुटुंबियांनी हा आरोप देखील खोडून काढला आहे.

टुनिशाच्या आत्महत्या प्रकरणात शीजान आणि तिच्या त्याच्या कुटुंबियांचे काहीही देणे-घेणे नाही. टुनिशा आणि शीजानचे ब्रेक झाले होते ते तुमच्या, मीडियाच्या आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या समोर आहे. ब्रेकअपनंतर त्याच्ये संबंध चांगले होते. ते पोलिसांनी सुद्धा त्यांच्या व्हाट्सअँप मेसेजवरून समजले आहे. टुनिशाचे तिच्या घरच्यांशी चांगले संबंध नव्हते. टुनिशाच्या वडिलांच्या निधनानंतर टुनिशा अपसेट राहायची. तुनिशाच्या आईचा आणि संजीव कौशलचे यांचे काय नाते आहे याची पोलिस चौकशी करीत आहेत. टुनिशाला संजीव कौशल डॉमिनेट करायचे तिचा कसलीच मुभा नव्हती. असा गौप्यस्फोट शीजानच्या वकिलांनी केला हं.

टुनिशा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात दिवसेमदिवस नवीन दवे करण्यात येत आहे. या प्रकरणात आरोपी सुरूवातील पोलिसांना सहकार्य देखील करत नव्हता. यामुळे पोलिसांना तपस करण्यात अडथळे निर्माण होत होते. या प्रकरणाला श्रद्धा वालकर प्रकरणाशी सुद्धा जोडण्यात आले होते. तसेच या हत्येला लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचे सुद्धा म्हटले जात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT