Akshara- Adhipati Haldi Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Akshara- Adhipati Haldi Viral Video: 'तुला शिकवीन चांगलाच धडा'मध्ये अधिक्षराचा हळदी समारंभ, सेटवरील BTS व्हिडीओ आला समोर

Tula Shikvin Changlach Dhada BTS Scene: गेल्या काही दिवसांपूर्वी 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेमध्ये अधिपती आणि अक्षराचा साखरपुडा पार पडला होता. आता लवकरच मालिकेत त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

Chetan Bodke

Akshara- Adhipati Haldi Viral Video

झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका 'तुला शिकवीन चांगलाच धडा'गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेमध्ये अधिपती आणि अक्षराचा साखरपुडा पार पडला होता. आता लवकरच मालिकेत त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. त्यांच्या लग्नाच्या शुटिंगला सुरुवात झाली असून सध्या सोशल मीडियावर BTS सीनची प्रचंड चर्चा होत आहे. नुकताच राजश्री मराठी च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हळदीच्या शुटिंगचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या मालिकेने फार कमी वेळातच प्रेक्षकांची मने जिंकली. मालिकेतील अधिपती- अक्षराच्या जोडीने सर्वांचेच मने जिंकले. मालिकेमध्ये येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये अक्षरा- अधिपतीचा लग्नसोहळा पार पडणार आहे. त्यासाठी प्रेक्षक फारच उत्साही असल्याचे दिसून येत आहे. मालिका सुरु झाल्यापासून मालिकेमध्ये नेहमीच नवनवीन वळणं आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर आता प्रेमात झाल्यापासून मालिकेला एक वेगळंच वळण आलेलं पाहायला मिळत आहे.

अधिपती- अक्षराच्या हळदीच्या शुटिंग दरम्यानचे व्हिडीओ राजश्री मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आले आहेत. सध्या सोशल मीडियावर अधिपती- अक्षराच्या फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल करताना '#अधिक्षरा' हा हॅशटॅग प्रचंड वापरला जात आहे. यामध्ये ते डान्सची प्रॅक्टिस करताना दिसून येत आहे. अक्षराने यावेळी पिवळ्या रंगाचा घागरा घातलेला दिसत असून, अधिपतीनेही पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घातलेला आहे. अक्षरा- अधिपतीचा लग्नसोहळा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पार पडणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Cylinder Price: दसऱ्याआधी महागाईचा चटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

SCROLL FOR NEXT