Akshara And Adhipati Haldi Photos Instagram
मनोरंजन बातम्या

Akshara And Adhipati Haldi Photos: अक्षराच्या आणि अधिपतीची लगीनघाई; मालिकेच्या सेटवरुन हळदीचे फोटो आले समोर

Tula Shikvin Changlach Dhada Serial Update: 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ह्या मालिकेतील अक्षरा आणि अधीपतीच्या हळदीतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Chetan Bodke

Akshara And Adhipati Haldi Photos

'तुला शिकवीन चांगलाच धडा' ह्या मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगवगेळे ट्विस्ट प्रेक्षकांच्या समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेली ही मालिका, टीआरपीमध्येही अव्वल ठरली आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अक्षराच्या आणि अधिपतीचा साखरपुडा झाला होता. आता साखरपुड्यानंतर प्रेक्षकांच्या समोर काही हळदीतले फोटोही समोर आले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी शुटिंगमधील काही BTS सीन समोर आले होते. अशातच सध्या सोशल मीडियावर शुटिंग दरम्यानचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. येत्या २८ आणि २९ सप्टेंबरच्या भागात आपण अक्षराच्या मेहेंदीचा कार्यक्रम पाहणार असून अक्षरा आणि अधिपतीची हळदही जोरदार धमाक्यात साजरी होणार आहे. दोघांच्या नात्याला नवीन वळण येणार असून ह्या हळदीच्या सोहळ्यात नक्की काय घडेल व अजून काही जबरदस्त ट्विस्ट येईल का हे पाहणे मनोरंजक ठरेल.

व्हायरल झालेल्या त्यांच्या ह्या लूकमध्ये, अक्षराने यावेळी पिवळ्या रंगाचा घागरा घातलेला दिसत असून, अधिपतीनेही पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घातलेला आहे. अक्षरा- अधिपतीचा लग्नसोहळा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पार पडणार आहे.

सध्या सोशल मीडियावर अक्षरा आणि अधिपतीचा लूक प्रचंड व्हायरल होत आहे. अक्षरा आणि अधिपतीच्या मेहेंदी आणि हळदीचा कार्यक्रम रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे.

या मालिकेत मुख्य भूमिकेत, शिवानी रंगोळे, हृषिकेश शेलार, कविता लाड सह अनेक नामवंत कलाकारांची फौज मालिकेत पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

SCROLL FOR NEXT