Sonal Pawar Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonal Pawar Wedding: 'तुला पाहते रे फेम' अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, सोनल आणि समीरचं धुमधडाक्यात लागलं लग्न

Sonal Pawar- Sameer Paulaste Wedding: ‘रमा राघव’ आणि 'तुला पाहते रे फेम' सोनल पवारने आज समीर पालुष्टेसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Priya More

Sonal Pawar Marriage:

२०२३ हे वर्ष बऱ्याच मराठी सेलिब्रिटींसाठी खूपच खास ठरलं आहे. या वर्षामध्ये अनेक सेलिब्रिटींनी लग्न करत आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात केली. या वर्षाच्या शेवटी अनेक सेलिब्रिंटीचे लग्न पार पडले. नुकताच अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर (Gautami Deshpande- Swanand Tendulkar) यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्यानंतर स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी (Swanandi Tikekar- Ashish Kulkarni) यांचे लग्न झालं. आता यांच्यापाठोपाठ आणखी एका टीव्ही अभिनेत्रीने लग्न केले आहे. 'तुला पाहते रे फेम' सोनल पवारचा (Sonal Pawar) मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला.

‘रमा राघव’ आणि 'तुला पाहते रे फेम' सोनल पवारने आज समीर पालुष्टेसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मराठमोळ्या पद्धतीने सोनल आणि समीर यांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नामध्ये समीर आणि सोनल खूपच क्युट दिसत होते. सोनलने राणी कलरची नऊवारी साडी नेसली होती. मराठमोळा साज केलेली सोनाली लग्नात खूपच सुंदर दिसत होती. तर तिचा पती समीरने ऑफ व्हाइट कलरचा कुर्ता आणि धोतर परिधान केले होते. डोक्यावर फेटा बांधलेला समीर लग्नात खूपच हँडसम दिसत होता.

सोनल आणि समीरच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी या फोटोंना चांगली पसंती दिली आहे. या फोटोंवर कमेंट्स करत सोनलच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत या कपलला आशीर्वाद दिले आहेत. त्याचसोबत त्यांना भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सोनाली प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. सुबोध भावे आणि गायत्री दातारच्या 'तुला पाहते रे' या मालिकेतून सोनल पवारला खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. या मालिकेमुळे ती घराघरामध्ये पोहचली. सध्या ती 'रमा - राघव' या मालिकेत काम करत आहे. यासोबतच तिने ‘बॉस माझी लाडाची’ या मालिकेतही काम केले आहे. तिने प्रसिद्ध गाण्यांमध्येही काम केले आहे. तर सोनालीचा पती समीर एक बिझनेसमॅन असून स्पार्कल्स मीडियाचा फाऊंडर आणि सीईओ आहे. यासोबतच तो डिजिटल मार्केटर आणि ब्रँड कन्सलटंट म्हणून काम करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT