Anup Ghosal passes away SAAM TV
मनोरंजन बातम्या

Anup Ghoshal : 'तुझसे नाराज नहीं जिंदगी'चा जादुई आवाज हरपला, अनुप घोषाल यांचं निधन

Nandkumar Joshi

Anup Ghoshal Death :

'मासूम' सिनेमातील 'तुझसे नाराज नहीं जिंदगी' हे गाणं आपल्या जादुई आवाजानं अजरामर करणारे प्रसिद्ध गायक अनुप घोषाल यांचं कोलकाता येथे निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते.

अनुप घोषाल यांनी बंगाली भाषेत सर्वाधिक गाणी गायली. हिंदी चित्रपटांसाठीही (Bollywood Films) त्यांनी अनेक गाणी गायली होती.

मासूम चित्रपटातील 'तुझसे नाराज नहीं जिंदगी' (Tujhse Naraz Nahi Zindagi) या गाण्याला दिलेल्या सुरेल आवाजानं त्याकाळी तरुणाईला मोहिनी घातली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या अनेक दिवसांपासून अनुप घोषाल यांच्यावर कोलकाता (Kolkata) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. वृद्धापकाळात त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. शुक्रवारी त्यांचं हृदयविकाराचा धक्क्यानं (Heart Attack) निधन झालं. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. अनुप घोषाल (Anup Ghosal death News ) यांनी तृणमूल काँग्रेसकडून २०११ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती.

अनुप घोषाल (Anup Ghoshal passes away) यांच्या निधनानं संगीत विश्वाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यांचे कुटुंबीय, नातेवाईकांच्या दुःखात मी सहभागी आहे, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली.

वयाच्या चौथ्या वर्षीच संगीताचे धडे

अनुप घोषाल यांनी वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. १९ वर्षांचे असताना आपल्या जादुई आवाजाने त्यांनी सत्यजीत रे यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी १९६७ मधील गुपी गेन बाघा बेन या चित्रपटातील गाण्यांना आपला आवाज दिला.

या चित्रपटाचे (Films) दिग्दर्शन सत्यजीत रे यांनी केलं होतं. घोषाल यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी बंगाली, हिंदी, (Bollywood Songs) भोजपुरी आणि आसामी भाषांमध्येही अनेक गाणी गायली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

SCROLL FOR NEXT