Shraddha Kapoor Dance Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shraddha Kapoor: श्रद्धाने विमानतळावर धरला चाहत्यासोबत ठेका, 'प्रमोशनसाठी काहीही...' म्हणत नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

श्रद्धाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये श्रद्धा एअरपोर्टवर फॅन्ससोबत डान्स करताना दिसत आहे.

Chetan Bodke

Shraddha Kapoor Dance Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिचा आगामी चित्रपट 'तू झुठी मैं मक्कर'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा 'तू झुठी मैं मक्कर' हा चित्रपट होळीच्या मुहूर्तावर ८ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. रणबीरसोबत श्रद्धा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. श्रद्धाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये श्रद्धा एअरपोर्टवर फॅन्ससोबत डान्स करताना दिसत आहे.

या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. 'तू झुठी मैं मक्कर'चा ट्रेलर आणि गाणीही रिलीज झाली आहेत, ज्यांना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाण्यात रणबीर आणि श्रद्धा जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. श्रद्धा ही बॉलिवूडमधील उत्कृष्ट डान्सर्सपैकी एक आहे. या गाण्यातील तिच्या डान्स स्टेप्सने चार चाँद लावले आहेत.

श्रद्धा कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये श्रद्धा कपूरचा एक चाहता तिच्यासोबत विमानतळावर डान्स करण्याची विनंती करतो. चाहत्याच्या विनंतीला मान देत श्रद्धा 'शो मी द ठुमका' या तिच्या नवीन गाण्यावर चाहत्यांसोबत तिने विमानतळावर डान्स केला.

सोशल मीडियावर अनेक यूजर्स श्रद्धा कपूरचे कौतुक करत आहेत. त्याचबरोबर अनेक नेटकऱ्यांनी काही अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे. नेटकऱ्यांच्या मते, कलाकारांना चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काहीही करायला लागतात.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या 'तू झुठी मैं मक्कर' या चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच क्रेझ पाहायला मिळत आहे. सोनू के टीटू की स्वीटी सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शक लव रंजन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या वापर करणाऱ्यांवर धाड

Kolhapur : केस ओढले, गळा आवळला, लाथाबुक्यांनी मारलं; घराच्या वाटणीवेळी तुंबळ हाणामारी|Video Viral

महामार्गावर भीषण अपघात; ओव्हरटेक करताना बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

'साहेब इकडे या', एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याने मारली उद्धव ठाकरेंना हाक; पुढे काय घडलं? VIDEO

शिंदेसेनेसोबत जाण्यास हरकत काय? ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे मोठे विधान, राज्याच्या राजकारणात भूकंप

SCROLL FOR NEXT