Akshay-Nora Troll: अक्षय-नोराने अख्खा स्टेज पुसून काढला; 'ऊ अंटावा' डान्स व्हिडीओवरुन ट्रोल

अक्षय कुमार आणि नोरा फतेहीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
Akshay-Nora Troll
Akshay-Nora TrollSaam Tv

Akshay Kumar And Nora Fatehi Dance Performance Get's Troll: बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता सध्या त्याच्या फ्लॉप चित्रपटांमुळे ट्रोल होत असून यावेळी एका वेगळ्याच कारणामुळे ट्रोल होतोय. अक्षय सध्या अमेरिकेत एंटरटेन्मेंट टूरवर गेला आहे. यावेळी त्याच्या सोबत मौनी रॉय, सोनम बाजवा, दिशा पटनी, अपारशक्ती खुराना आणि नोरा फतेही सारख्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

त्यांच्यासोबत अक्षय कुमारही चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. या एंटरटेन्मेंट टूरमधील सेलिब्रिटींच्या अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे.

Akshay-Nora Troll
AP Dhillon In WPL 2023: एपी ढिल्लों लाईव्ह परफॉर्न्समध्ये पडला ढिल्ला, चाहते-नेटकरी निराश

नुकतेच अक्षय कुमार आणि नोरा फतेहीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये अल्लू अक्षय आणि नोरा या दोघांनी पुष्पा चित्रपटातील सुपरहिट गाण्यावर डान्स केला आहे. अक्षय आणि नोरा फतेहीच्या डान्सने अक्षरश: नेटकऱ्यांना नक्की हसावं की रडावं असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अशा या फुल्ल एंटरटेन डान्समध्ये अक्षय आणि नोरा स्टेजवर लोळताना दिसत असल्याच्या कमेंट्स नेटकरी करीत आहे. या एंटरटेन्मेंट टूरमध्ये अक्षय आणि नोराने 'ओ अंटावा' गाण्यावर डान्स केला होता. या दोघांचाही व्हिडीओ सध्या त्यांच्या फॅन्स ग्रुपवर बराच व्हायरल होत आहे. नेहमीप्रमाणे दोघांनाही कोणी ट्रोल केले तर कोणी त्यांचे कौतुक केले आहे.

ज्याप्रकारे साऊथ सिनेमांचे फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे, ते पाहता बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. सोबतच बॉलिवूडचे चाहतेही हळूहळू साऊथ सिनेमाचे चाहते होऊ लागले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Akshay-Nora Troll
Brahmastra 2 मध्ये ‘देव’ कोण? दिग्दर्शकांनी जाहीर केली प्रदर्शनाची तारीख

अक्षय आणि नोराचा डान्स पाहून नेटकरी म्हणतात, 'हेच पाहणं बाकी होतं' तर आणखी एक म्हणतो, 'अक्षय कधी वयाला शोभेल अशा भूमिका करेल काय माहित,नोरा मुलगी दिसतेय त्याची' तर आणखी एकाने भन्नाट कमेंट केली आहे, 'अक्षय-नोराने अख्खा स्टेज पुसून काढला.' 'समांथाच्या पुढे नोराच्या हुक स्टेप्स फारच फिक्या आहेत.' अशी कमेंट देखील एका नेटकऱ्याने केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com