Ranbir Kapoor
Ranbir Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor New Project: सौरव गांगुली नाही तर 'या' प्रसिद्ध गायकाच्या जीवनप्रवासावर 11 वर्षांपासून काम करतोय रणबीर कपूर

Chetan Bodke

Kishor Kumar Biopic: लव रंजनच्या प्रॉडक्शन हाऊसने सप्टेंबर २०२१ मध्ये सौरव गांगुलीच्या जीवनपटाची घोषणा केली होती. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाची बरीच चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सौरव गांगुलीच्या प्रमुख भूमिकेत रणबीर कपूर दिसणार असल्याची चर्चा सध्या जोरात आहे.

दरम्यान, रणबीर आज लवचा चित्रपट 'तू झुठी मैं मक्कर'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कोलकाता येथे एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये, रणबीरने पुष्टी केली की तो सौरव गांगुलीच्या नव्हे तर दिग्गज गायक-अभिनेता किशोर कुमारच्या बायोपिकमध्ये काम करणार आहे.

रणबीर त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोलकात्यात आला होता, त्याने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तो गायक-अभिनेता किशोर कुमारच्या बायोपिकवर काम करत आहे. सौरव गांगुलीच्या बायोपिकबद्दल बोलताना रणबीर म्हणाला, “मला वाटते दादा (सौरव गांगुली) हे केवळ भारतातच नाही तर जगभरातील दिग्गज व्यक्ती आहे. त्यांच्यावर बनवलेला बायोपिक खूप खास असेल. मात्र, मला या चित्रपटाची ऑफर आलेली नाही. माझ्या अंदाजे लव फिल्म्सचे निर्माते अजूनही त्या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहित आहेत. मी 11 वर्षांपासून किशोर कुमारच्या बायोपिकवर काम करत आहे. आम्ही ते अनुराग बसूसोबत लिहित आहोत आणि मला आशा आहे की हा माझा पुढचा बायोपिक असेल.“

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर अलीकडेच कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर एकत्र दिसले. दोघांच्या एकत्र फोटोमुळे बायोपिकच्या अफवांना उधाण आले आहे होते. 'संजू'मध्ये संजय दत्तची भूमिका साकारल्यानंतर चाहत्यांना रणबीर कपूरला आणखी एका बायोपिकमध्ये पाहण्याची इच्छा आहे.

रणबीर दिग्गज किशोर कुमारचा बायोपिक करत असल्याची पुष्टी झाली आहे. या सगळ्यामध्ये रणबीर 'तू झुठी मैं मक्कार'च्या तयारीत आहे. हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित होत आहे. यामध्ये त्याने पहिल्यांदाच श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs KKR : गुजरातचं प्लेऑफचं स्वप्न पावसात गेलं वाहून; GT vs KKR सामना एकही चेंडू न टाकता रद्द

Sushil Kumar Modi: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mamata Banerjee: लोकसभा निवडणुकीत भाजप 195 पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही, ममता बॅनर्जी यांचा दावा

Maharashtra Politics 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर उद्या सुनावणी; ऐन निवडणुकीत कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

Babar Azam Record: बाबर आझमने रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये रोहित, धोनीलाही सोडलं मागे

SCROLL FOR NEXT