Couple Engagement SAAM TV
मनोरंजन बातम्या

Couple Engagement : लोकप्रिय सिंगर ३५ व्या वर्षी अडकणार लग्न बंधनात; साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर, होणारा नवरा कोण?

Travis Kelce-Taylor Swift Engagement : मनोरंजनसृष्टीतील एका प्रसिद्ध जोडप्याने नुकताच साखरपुडा केला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Shreya Maskar

लोकप्रिय सिंगर टेलर स्विफ्ट लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.

नुकताच टेलर स्विफ्टचा साखरपुडा पार पडला आहे.

साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मनोरंजनसृष्टीतून आनंदाची बातमी समोर आली आहे. ट्रैविस केल्स (Travis Kelce) आणि पॉप स्टार टेलर स्विफ्ट (Taylor Swift) यांनी साखरपुडा करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडिया अकाउंटवर साखरपुड्याचे काही सुंदर फोटो त्यांनी शेअर केले आहेत. गेल्या वर्षीपासून दोघेही त्यांच्या नात्यामुळे चर्चेत होते. सप्टेंबर 2023 मध्ये जेव्हा केल्सच्या टीम कॅन्सस सिटी चीफ्सने शिकागो बेअर्सचा 41-10 असा पराभव केला तेव्हा दोघेही पहिल्यांदा एकत्र दिसले. तेव्हापासून सोशल मीडियावर दोघांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू आहे.

चाहत्यांना दोघांची जोडी खूप आवडली आहे. त्याच्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "तुमचे इंग्रजी शिक्षक आणि तुमचे जिम शिक्षक लग्न करत आहेत." या पोस्टमध्ये पाच फोटो देखील शेअर करण्यात आले आहेत. यांवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. फोटोंमध्ये दोघेही खूप रोमँटिक पोझ देताना दिसत आहेत. यासोबतच फोटोंमध्ये दोघेही साखरपुड्याची अंगठी दाखवतानाही दिसत आहे.

एका मुलाखतीत, ट्रैविस केल्सने सांगितले होते की, तो टेलर स्विफ्टला त्याचा नंबर फ्रेंडशिप ब्रेसलेटवर लिहून देऊ इच्छित होता, परंतु ते होऊ शकले नाही. त्यानंतर त्याने त्यांच्या नात्याची सुरुवात उघडपणे सांगितली. त्याने सांगितले की, न्यू यॉर्कमधील पहिल्या भेटीपूर्वीच दोघांमध्ये बोलने सुरू झाले होते. या नंतर टेलर स्विफ्ट NFL सामन्यांमध्ये केल्सला पाठिंबा देताना दिसली. त्यांचा किस करताचा एक व्हिडीओ देखील खूप व्हायरल झाला होता.

टेलर स्विफ्टच्या 'अरेज टूर'च्या समाप्तीनंतर केल्स तिच्या संगीत कार्यक्रमांमध्ये अनेक वेळा दिसला. त्यांच्या साखरपुड्या पूर्वीच सोशल मिडिया दोघे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा रंगली होती. आता चाहते ट्रैविस केल्स आणि पॉप स्टार टेलर स्विफ्ट यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT