Engagement Ring: साखरपुड्याची अंगठी नेहमी करंगळीच्या बाजूच्या बोटात घालण्याचा खास अर्थ काय? जाणून घ्या कारण

Dhanshri Shintre

आनंदाचा क्षण

विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि अत्यंत आनंदाचा क्षण मानला जातो.

अनेक पारंपरिक विधी

हिंदू परंपरेनुसार विवाह समारंभात अनेक पारंपरिक विधी आणि संस्कार पार पाडले जातात.

विधींची सुरुवात

हिंदू विवाहपरंपरेत साखरपुड्याने लग्नाच्या विविध विधींची सुरुवात होते आणि विवाह प्रक्रियेला गती मिळते.

अंगठी

या समारंभात वधू आणि वर एकमेकांच्या बोटात अंगठी घालून आपले नाते अधिकृत करतात.

प्रेम आणि निष्ठेचे प्रतीक

डाव्या हाताच्या अनामिकेच्या बोटात अंगठी घालण्याची परंपरा प्रेम आणि निष्ठेचे प्रतीक मानली जाते.

खास महत्त्व

वैदिक ज्योतिषानुसार अनामिका बोट प्रेम, ऊर्जा आणि तेज यांचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे याला खास महत्त्व आहे.

डाव्या हाताच्या अनामिकेवर

वैवाहिक नाते कायम टिकावे म्हणून डाव्या हाताच्या अनामिकेवर अंगठी परिधान करण्याची परंपरा पाळली जाते.

अंगठी घालण्याची प्रथा

डाव्या हाताची चौथी बोट हृदयाशी जोडलेली मानली जाते, त्यामुळे त्या बोटात अंगठी घालण्याची प्रथा आहे.

NEXT: लग्नात नवरदेव किंवा नवरीच्या बहिणीला 'करवली' का म्हणतात? जाणून घ्या

येथे क्लिक करा