Toxic Movie Review Saam Tv
मनोरंजन बातम्या

Toxic Movie Review: यशचा टॉक्सिक थिएटरमध्ये पास की फेल? प्रेक्षकांनी सांगितला कसा वाटला सिनेमा

Toxic Movie Review: यशच्या ‘टॉक्सिक’ला प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. यशचा अभिनय, ॲक्शन आणि स्क्रीन प्रेझेन्सचं कौतुक होत असलं तरी कथानकावर काहींनी टीका केली आहे.

Shruti Vilas Kadam

Toxic Movie Review: यशची मुख्य भूमिका असलेला ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट अखेर २६ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर यश मोठ्या पडद्यावर परतल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये दमदार कामगिरी केली होती. २५ ऑगस्टपर्यंत चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगने ९ लाखांचा टप्पा ओलांडला होता. परदेशातही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

यशचा अभिनय आणि स्क्रीन प्रेझेन्सचं कौतुक

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. अनेकांनी यशचा अभिनय, त्याची स्क्रीन प्रेझेन्स, ॲक्शन सीन्स आणि चित्रपटाचे कौतुक केलं आहे. विशेषतः यशची एन्ट्री, गाणी, इंटरव्हल ब्लॉक आणि क्लायमॅक्समधील काही प्रसंग प्रेक्षकांना आवडले आहेत.

यशची दमदार एन्ट्री

एका चाहत्याने चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देताना यशची एन्ट्री, त्याचा स्वॅग आणि दमदार ॲक्शनचं कौतुक केलं. नयनतारासोबतची ॲक्शन सीन अप्रतिम असल्याचं काही प्रेक्षकांनी म्हटलं आहे. दक्षिण भारतातील चित्रपटगृहांमध्ये यशला पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असल्याच्याही प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिसत आहेत.

सेकेंड हाफ अपेक्षेप्रमाणे नाही

मात्र, ‘टॉक्सिक’ला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही प्रेक्षकांना चित्रपटाचा फस्ट हाफ आकर्षक वाटला असला, तरी सेकेंड हाफ अपेक्षे इतका उत्तम नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. काही वेळा स्टोरी भरकटलेली आणि कंटाळवाणी वाटल्याच काही युजर्सनी म्हटलं आहे. एका युजरने ‘टॉक्सिक’वर ‘KGF’चा प्रभाव जाणवत असल्याचं म्हटलं. तसंच काही ॲक्शन सीनमध्ये खूप टेकनिकल वापरल्याने सीन फेक वाटले असल्याची तक्रार केली आहे. काही प्रेक्षकांनी तर चित्रपटाला ‘डिझास्टर’ म्हटलं आहे,

५०० ते ६०० कोटी चित्रपटाचं बजेट

गीतू मोहनदास यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात यशसोबत कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी आणि तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचं बजेट तब्बल ५०० ते ६०० कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं सांगितलं जात आहे. आता प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रियांनंतर ‘टॉक्सिक’ बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्र सर्वात मोठं बहुभाषिक राज्य, शाहांच्या विधानावरून वाद पेटला

Britain News: देशाचे तीन भागात होणार विभाजन; नेत्यांच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या

Fact Check: बुरखाधारी महिलेच्या हातात गणपती बाप्पा? मुंबईत मुस्लीम महिला गणपती घेऊन का फिरतेय?

Sheikh Hasina : ७ नेत्यांना मृत्युदंडाची शिक्षा; शेख हसीना यांना मोठा झटका, काय आहे प्रकरण?

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात गणेश आगमन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी 6 गणेश मंडळांवर पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT