Tom Cruise Stunt in Mission Impossible- Dead Reckoning Part One
Tom Cruise Stunt in Mission Impossible- Dead Reckoning Part One Twitter/@DiscussingFilm
मनोरंजन बातम्या

Tom Cruise : टॉम क्रूझच्या थरारक स्टंटने चाहत्यांना भुरळ; Mission Impossible 7 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hollywood : टॉम क्रूझ (Tom Cruise) हे हॉलिवूड (Hollywood) इंडस्ट्रीतील एक असे नाव आहे, ज्याला अॅक्शन जगताचा बादशाह म्हटले जाते, देश-विदेशात टॉमची चर्चा रंगली आहे, त्यामुळेच आज त्याची इतकी जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. टॉम क्रूझचे लवकरच 2022 आणि 2023 मध्ये दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ज्याबद्दल चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. टॉम क्रूझचे मिशन: इम्पॉसिबल- डेड रेकनिंग पार्ट वनसाठी (Mission Impossible- Dead Reckoning Part One) स्टंट (Stunt) करत असताना एक फोटो समोर आला आहे. यात टॉम हा हजारो फूट उंचीवर उडत्या विमानावर लटकलेला आहे. टॉम क्रूझच्या चित्रपटांमध्ये असे थरारक आणि स्वतःचे स्टंट करण्यासाठी त्याला ओळखले जाते. तसेच 2000 फूट उंच खडक चढणे, ६ मिनिटे पाण्याखाली श्वास रोखून धरणे, त्याने हे सर्व स्टंट त्याने केले आहेत. मिशन: इम्पॉसिबल- डेड रेकनिंग पार्ट वनच्या या फोटोमध्ये, तो WWII बायप्लेनच्या स्टॅण्डला लटकताना दिसत आहे. (Mission Impossible 7: Tom Cruise Hangs Crazily From Biplane In A New Viral Pic)

हे देखील पाहा -

'मिशन इम्पॉसिबल' या मालिकेसाठी टॉम क्रूझ भारतात खूप प्रसिद्ध होते. टॉमचा चित्रपट टॉप गन-मॅव्हरिकने जगभरातील बॉक्स ऑफिसवर US$1 बिलियनपेक्षा जास्त कमाई केली आहे. आपल्या 40 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीत, अभिनेत्याने असे अनेक चित्रपट दिले, ज्यामुळे तो सर्वोत्कृष्ट अभिनेता बनला. टॉम क्रूझचा जन्म 3 जुलै 1962 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला. तो फक्त 11 वर्षांचा असताना त्याचे पालक वेगळे झाले. एका साध्या कुटुंबात जन्मलेल्या टॉम क्रूझचे बालपण इतर मुलांसारखे अजिबात सामान्य नव्हते. काही काळापूर्वी एका मुलाखतीत टॉम क्रूझने सांगितले होते की, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अजिबात चांगली नव्हती. त्याचे वडील त्याला अनेकदा मारहाण करायचे.

काही काळानंतर टॉमने एका शिक्षकाच्या सांगण्यावरून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्यानंतर टॉमला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा ब्रेक मिळाला. 1983 मध्ये 'रिस्क बिझनेस' या चित्रपटाने त्यांना लोकांमध्ये प्रसिद्धी मिळाली. यादरम्यान त्याचा अभिनय लोकांना खूप आवडला. 60 वर्षीय टॉम क्रूझ आजही तरुण कलाकारांना मात देतो, तो अनेकदा त्याच्या लूकमुळे चर्चेत असतो.

टॉम क्रूझला तीन वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. इतकंच नाही तर त्याला तीनदा अकादमी पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले आहे. टॉम क्रूझचे जेरी मॅग्वायर, मंगोलिया, बॉर्न ऑन द फोर्थ ऑफ जुलै, अ फ्यू गुड मॅन आणि मिशन इम्पॉसिबल या सिरीज हे सर्वात लोकप्रिय आहेत.

रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन अभिनेता आणि निर्माता टॉम क्रूझची संपत्ती $620 दशलक्ष आहे. टॉम क्रूझ भारतीय रुपयांमध्ये एकूण 48 अब्ज 13 कोटी 55 लाख 91 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. टॉम क्रूझचे कोलोरॅडोमध्ये घर आहे, ज्याची किंमत $30 दशलक्ष आहे. याशिवाय टॉमकडे 38 दशलक्ष डॉलर्सच्या कार आणि विमाने आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Teacher Fight Video: शाळेत तुफान राडा; शिक्षिका आणि मुख्यध्यापिकेमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

Bhandara Forest : शिकारीच्या तयारीत असलेला शिकारी वन विभागाच्या ताब्यात; घरातून अस्वलाचे दोन नखे केली जप्त

Helicopter Crash Video: हवेत गिरट्या घातल्या; हेलकावे खाल्ले अन् क्षणात कोसळलं.. सुषमा अंधारेंचं हेलिकॉप्टर क्रॅश; थरारक VIDEO

Dark Circles Removal : डोळ्यांवरील डार्कसर्कल १० मिनीटांत होतील गायब

Maharashtra Election: १३ जागांवर ठाकरे गट विरुद्ध शिवसेना; १५ ठिकाणी काँग्रेस -भाजप 'सामना', कुठे-कोण आमनेसामने?

SCROLL FOR NEXT