K Viswanath And Wife Jayalakshmi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jayalakshmi Passed Away: दिग्दर्शक के. विश्वनाथ यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनंही जगाचा घेतला निरोप; ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तेलगू सिनेसृष्टीतील दिग्दर्शक के विश्वनाथ यांची पत्नी जयलक्ष्मी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

Chetan Bodke

K Viswanath's Wife Jayalakshmi Passed Away: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून दुःखद बातमी आहे, तेलगू सिनेसृष्टीतील दिग्दर्शक के विश्वनाथ यांचे 24 दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर एका महिन्याच्या आतच त्यांच्या पत्नी जयलक्ष्मी यांनीही जगाचा अखेरचा निरोप घेतला. वयाच्या 88 वर्षी जयलक्ष्मी यांनी हैदराबाद मधील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. रविवारी वृद्धापकाळाने जयलक्ष्मी यांची प्राणज्योत मालवली.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक के विश्वनाथ यांचे 2 फेब्रुवारी 2023 रोजी निधन झाले होते. ते 92 वर्षांचे होते. त्यांना वयोमानानुसार काही संबंधित आजार झाल्याने त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांचे शरीर डॉक्टर करत असलेल्या उपचारांना प्रतिसाद देत नव्हते, उपचाराअंती त्यांचे निधन झाले.

गेल्या काही दिवसांपुर्वी टॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी जयलक्ष्मी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. जयलक्ष्मी यांच्या निधनाचे बातमी कळताच पवन कल्याण यांनी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत पवन कल्याण म्हणतात, ‘जयलक्ष्मी यांच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांच्या निधनाची बातमी कळताच, फार वाईट वाटले. योगायोग म्हणजे, योगायोग म्हणजे 25 दिवसांपूर्वीच के. विश्वनाथ यांनी अखेरचा श्वास घेतला होता. आणि आता त्यांच्या पत्नी. माझे सांत्वन त्यांच्या कुटुंबासोबत आहे.’

के. विश्वनाथ आणि जयलक्ष्मी यांच्या पश्चात तीन मुले रवींद्रनाथ विश्वनाथ, नागेंद्रनाथ विश्वनाथ आणि एक मुलगी पद्मावती विश्वनाथ आणि सहा नातवंडे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

Phone Charging: फोन चार्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा आग लागू शकते

Maharashtra Politics : ठाकरेंना रोखण्यासाठी फिल्डिंग? एकनाथ शिंदेंचा अमित शाहांपुढे सीएमपदाचा प्रस्ताव?

Sanjay Gaikwad : कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणं भोवलं, संजय गायकवाडांना दणका; अखेर पोलिसांत गुन्हा, VIDEO

शिवरायांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा, युनेस्काच्या यादीत समावेश, जाणून घ्या नावे | VIDEO

SCROLL FOR NEXT