Pushpa 2 Movie Song Poster Saam TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Song: 'पुष्पा 2' चित्रपटातील 'अंगारो' गाणं रिलीज; पुष्पा आणि श्रीवल्लीच्या हटके डान्सने वेधलं लक्ष

Pushpa 2 Movie Angaro Song Out: 'पुष्पा २' चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी 'पुष्पा पुष्पा' हे गाणं प्रदर्शित केलं होतं. त्यानंतर आता 'अंगारो' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दाक्षिणात्य चित्रपट 'पुष्पा 2'ची सध्या सर्वत्र आहे. पुष्पाच्या यशानंतर आता चित्रपटाचा सिक्वेल पुष्पा २: द रुल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लु अर्जुन आणि रश्मिकाची केमिस्ट्री चाहत्यांना पाहायला मिळत आहे. यानंतर आता चित्रपटातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

काही दिवसांपूर्वी 'पुष्पा २: द रुल' या चित्रपटातील पुष्पा पुष्पा गाणं लाँच झालं होतं. त्यानंतर आता अंगारो हे गाण प्रदर्शित झालं आहे. हे चित्रपटातील रोमँटिक गाणं आहे. अंगारो के अंबर सा मेरा सामी.. असं या गाण्याचे बोल आहेत. व्हिडिओत गाण्याचं मेकिंग दाखवण्यात आलं आहे. या गाण्यात रश्मिका आणि अल्लु अर्जुन हूक स्टेप करताना दिसत आहे. गाण्याचे लिरिक्स खूपच छान आहे.

'अंगारो' हे गाणा श्रेया घोषालने गायलं आहे. तर गाण्याचे नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केलं आहे. तेदेखील गाण्याच्या व्हिडिओत गाणं गाताना दिसत आहे. हे गाणं काही तासातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायर झाला आहे.

'पुष्पा २' चित्रपट १५ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पुष्पाप्रमाणेच पुष्पा २ चित्रपटाला खूप जास्त प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यक्ती केली जात आहे. चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका प्रमुख भूमिकेत तर फहद फासिल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : दादांशिवाय पुण्यात राज्यात काम करणे अवघड- मुरलीधर मोहोळ

Ajit Pawar Death: अजित पवारांचा जन्म कुठे झाला? जाणून घ्या त्यांचे सुरुवातीचे जीवन

Ajit Pawar Death : कार्यकर्त्यांना जपणारा नेता....उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Ajit Pawar Death : अजित पवारांचं फोनवरून शेवटचं बोलणं कुणासोबत झालं?

Ajit Pawar passed away: महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला, Raj Thackeray यांनी ट्विट करत अजितदादांना वाहिली श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT