Sai Pallavi Dating Married Celebrity Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sai Pallavi Dating Rumourous : साई पल्लवी विवाहित आणि 2 मुलांचा बाप असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट? टॉलिवूड इंडस्ट्रीत होतेय एकच चर्चा

Sai Pallavi Dating Married Celebrity : टॉलिवूड अभिनेत्री साई पल्लवी हिने आपल्या दिलखेचक अदाकारींमुळे प्रेक्षकांवर भुरळ पाडली आहे. सध्या साई तिच्या आगामी चित्रपटामुळे नाही तर, तिच्या खासगी लाईफमुळे चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

टॉलिवूड अभिनेत्री साई पल्लवी हिने आपल्या दिलखेचक अदाकारींमुळे प्रेक्षकांवर भुरळ पाडली आहे. साई पल्लवी टॉलिवूडसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या निखळ सौंदर्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून साई 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण सध्या साई तिच्या आगामी चित्रपटामुळे नाही तर, तिच्या खासगी लाईफमुळे चर्चेत आली आहे. तमिळ मीडियाने दिलेल्या एका माहितीमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

अनेक मिडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री साई पल्लवी एका विवाहित अभिनेत्याला डेट करत आहे. या बातमीमुळे आता साई पल्लवीचे चाहते भलतेच चिंतेत पडले आहेत. त्या विवाहित अभिनेत्यासोबत साई पल्लवी रिलेशनशिपमध्ये असल्याचेही बोलले जात आहे. सिनेजोशच्या रिपोर्टनुसार, साई पल्लवी एका विवाहित अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या बातमीमुळे सर्वच चिंतेत पडले आहेत. त्याशिवाय त्याला दोन मुलंही आहेत. दरम्यान, ही बातमी किती खरी आणि किती खोटी याबद्दल कोणतीही माहिती नाही. हे वृत्त सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असून या वृत्तावर कोणाचाच विश्वास बसत नाही.

साईच्या या रिलेशनशिपच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे. मात्र, असं असलं तरीही साई पल्लवीच्या पीआर टीमकडून याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. शिवाय, अभिनेत्रीकडूनही कोणतंच स्पष्टीकरण मिळालेलं नाही. त्यासोबतच तिच्या कुटुंबीयांनीही या चर्चांवर भाष्य केलेले नाही. चाहते साईच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत आहेत. साईने अभिनयासोबतच आपल्या डान्स स्किलच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख तयार केलेली आहे. साईनं तेलुगू, तमिळ आणि केरळ चित्रपटसृष्टीत कमालीचं काम केलं आहे.

साई पल्लवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, रणबीर कपूरसोबत 'रामायण' चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. रणबीर प्रभु श्री रामाच्या तर साई पल्लवी देवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी करणार आहे. सध्या दोघेही चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

SCROLL FOR NEXT