Vijay Deverakonda On Rumours Of Engagement To Rashmika Mandanna Saam tv
मनोरंजन बातम्या

Vijay Devarakonda On Engagement Rumours: 'ते माझ्या लग्नाची वाट पाहत आहेत...'; रश्मिकासोबतच्या साखरपुड्याच्या चर्चांवर विजय देवरकोंडाने सोडलं मौन

Vijay And Rashmika Engagement Rumours: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाच्या साखरपुड्याच्या अनेकदा चर्चा झाल्या आहेत. नुकतंच स्वतः विजय देवरकोंडाने त्यांच्या लग्नाच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे.

Chetan Bodke

Vijay Deverakonda On Rumours Of Engagement To Rashmika Mandanna

टॉलिवूडमधील लोकप्रिय कपल म्हणजे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना. या कपलच्या साखरपुड्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हे कपल फेब्रुवारी महिन्यामध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चाही सुरु होत्या. खरंतर या दोघांच्या साखरपुड्याच्या अनेकदा चर्चा झाल्या आहेत. नुकतंच स्वतः विजय देवरकोंडाने त्यांच्या लग्नाच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. (Tollywood)

नुकतंच विजयने त्याच्या आणि रश्मिकाच्या साखरपुड्याच्या होत असलेल्या चर्चांवर भाष्य केलं आहे. ‘लाइफस्टाइल एशिया’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता विजय देवरकोंडा म्हणाला, “मी फेब्रुवारी महिन्यामध्ये साखरपुडा किंवा लग्न करणार नाही. माध्यमं दर दोन वर्षाला माझे लग्न करते. मी दरवर्षी साखरपुड्याच्या आणि लग्नाच्या अफवा ऐकतो. माध्यमं माझ्या लग्नाची वाट पाहत आहेत.” असं विजय या मुलाखतीत म्हणाला. (Actor)

सोशल मीडियावर विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाचे विएतनाममध्ये क्वालिटी टाइम स्पेंड करत असतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. क्वालिटी टाइम स्पेंड करत असतानाचे फोटो काही दिवसांपूर्वीच विजयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले होते. तिथे धमाल मस्ती करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओही तुफान व्हायरल झाले होते.

रश्मिका व विजयने ‘गीता गोविंदम’, ‘डिअर कॉम्रेड’ या रोमँटिक तेलुगू चित्रपटात एकत्र काम केलं आहे. या दोघांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oli Bhel Recipe: चौपाटीवर मिळणारी चटपटीत ओली भेळ, वाचा सीक्रेट रेसिपी

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT