Vijay Deverakonda Saam Tv
मनोरंजन बातम्या

Manali Trip Arrange In Vijay Devarkonda: तुम्ही फॅन असाल तर लॉटरी लागलीच! 'हा' कलाकार चाहत्यांना पाठवणार मनाली ट्रीपला...

विजय देवरकोंडाने शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये तो आपल्या 100 चाहत्यांना सुट्टीसाठी मनालीला फिरायला नेणार आहे.

Chetan Bodke

Manali Trip Arrange In Vijay Devarkonda: २०२२ मध्ये दाक्षिणात्य चित्रपटांची बरीच चलती होती. सोबतच अनेक कलाकार मंडळी ही गेल्या वर्षी कमालीचे प्रकाश झोतात आले. काही कलाकार आपल्या उत्कृष्ट कामगिरीने तर काही चित्रपटांमुळे चर्चेत आले. त्यातीलच एक कलाकार म्हणजे, विजय देवरकोंडा.

दाक्षिणात्य कलाकार विजय देवरकोंडा सध्या कमालीचा चर्चेत आला आहे. तो नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याच्या एका सोशल मीडियावरील पोस्टने सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

विजय देवरकोंडाने आपल्या चाहत्यांना नव वर्षाचे औचित्य साधत ही गुड न्युज दिली. विजय देवरकोंडाने नुकतेच शेअर केलेल्या एका पोस्टच्या माध्यमातून जाहीर केले की तो आपल्या 100 चाहत्यांना सुट्टीसाठी मनालीला फिरायला नेणार आहे. ही खास ट्रीप पाच दिवसांची असून या सहलीतील सर्वांचा प्रवास, राहण्याचा आणि जेवणाचा सर्व खर्च स्वत: विजय देवराकोंडा उचलणार आहे. मोफत ट्रिपच्या माध्यमातून विजय देवरकोंडाने आपल्या चाहत्यांना ही खास भेट दिली आहे.

जर तुम्हीही देवरकोंडाचे चाहते असाल आणि या सहलीला जायचे असेल तर तुम्ही तुमचे नशीब आजमावू शकता. यासाठी तुम्हाला विजय देवराकोंडा यांच्या इंस्टाग्रामवर दिलेल्या Devarsanta या लिंकवर क्लिक करावे लागेल आणि त्या फॉर्ममधील सर्व माहिती भरावी लागणार आहे. पण या सहलीला जाण्यासाठी एक महत्त्वाची अट म्हणजे तुमचे वय १८ पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला देवराकोंडाने चाहत्यांना त्याच लिंकवर विचारले होते की तुम्हाला कुठे फिरायला जायला आवडेल. विजय देवरकोंडाने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सांगितले आहे की बहुतेक चाहत्यांनी सांगितले की त्यांना मनालीला जायला आवडेल. म्हणूनच या अभिनेत्याने मनालीची निवड केली आहे. जिथे 100 निवडक चाहत्यांना बर्फाच्छादित पर्वत पहायला मिळतील आणि ते संपूर्ण प्रवासाचा मोफत आनंद घेऊ शकतील.

या चाहत्यांसाठी सहलीत अनेक उपक्रमही केले जाणार असल्याचे विजय देवरकोंडाने सांगितले. या संबंधित माहिती तो लवकरात लवकर देणार असल्याचे सांगितले आहे. विजय आणि अनन्या पांडेचा लिगर चित्रपट कमालीचा फ्लॉप झाल्यानंतर लवकरच त्याचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समांथा प्रभू रुथ सोबत विजय देवरकोंडा खुशी नावाच्या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT