Siddharth, Entertainment News Instagram/ @worldofsiddharth
मनोरंजन बातम्या

Siddharth: टॉलिवूड अभिनेता सिद्धार्थचा विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांवर आरोप, म्हणाला 'माझ्या पालकांना'...

'रंग दे बसंती' फेम अभिनेता सिद्धार्थ नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. नेहमीच तो आपले परखड मत सोशल मीडियावर मांडत असतो.

Chetan Bodke

Siddharth: 'रंग दे बसंती' (Rang De Basanti) फेम अभिनेता सिद्धार्थ नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. सिद्धार्थ नेहमीच आपल्या वेगवेगळ्या विषयांवरील मुद्द्यांवर परखड मत मांडत असतो. नुकतीच त्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.

सिद्धार्थने विमानतळावरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांवर त्याच्या पालकांना त्रास दिल्याचा आरोप केला आहे.

सिद्धार्थने विमानतळ आणि सीआयएसएफ जवानांवर गंभीर आरोप केले आहेत. त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर विमानतळाचा फोटो शेअर केला आहे. त्याने इंस्टाग्राम पेजवरुन विमानतळ कर्मचारी व अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

सिद्धार्थ पोस्टच्या माध्यमातून म्हणतो, अलीकडेच मदुराई विमानतळावर त्याच्या पालकांना सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्रास दिला आहे. अधिकाऱ्यांना इंग्रजीत बोलायला सांगण्यात आले होते, पण तरीही त्याच्या कुटुंबीयांशी हिंदीत बोलण्यात आले. विरोध केला असता अधिकाऱ्यांनी 'भारतात असेच घडते' असे सांगितले.

अभिनेता सिद्धार्थने इंस्टाग्राम स्टोरीमधुन आरोप केला आहे की, विमानतळ सुरक्षा कर्मचार्‍यांनी माझ्या वृद्ध पालकांना 20 मिनिटे त्रास दिला आहे. त्यांनी माझ्या वृद्ध पालकांना त्यांच्या बॅगमधून नाणी काढायला लावली. आम्ही त्यांना वारंवार इंग्रजीत बोलायला सांगितले तरी ही ते अधिकारी आमच्यासोबत हिंदीत बोलत होते.

Siddharth

सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये थेट सीआरपीएफ आणि केंद्रीय राखीव पोलिस दलावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. तसेच त्यांच्यावर गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. वास्तविक, मदुराई विमानतळावरील सुरक्षा सीआयएसएफ दलाकडे आहे. सिद्धार्थच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

सिद्धार्थने अनेक तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'रंग दे बसंती' या चित्रपटातून सिद्धार्थने बॉलिवूड अभिनेता आमिर खानसोबत काम केले होते. सिद्धार्थचा अभिनय सर्व प्रेक्षकांना आवडला. आता तो कमल हसन स्टारर 'इंडियन 2' मध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : 'मला पाहिजे ते तुम्ही द्या...' शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

ZP And Municipal Elections: निवडणुकीत आरक्षण मर्यादेचं उल्लंघन; झेडपी, महापालिका निवडणूक लांबणीवर?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Famous Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, VIDEO होतोय व्हायरल

Raj Thackeray: 'यांना मुंबई हे नाव खटकतंय...' केंद्रीय मंत्र्याला राज ठाकरेंनी झापलं

SCROLL FOR NEXT