Ram Charan Game Changer Fees Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ram Charan Game Changer Fees : रामचरणच्या 'गेम चेंजर'ची प्रदर्शनापूर्वीच चर्चा, अभिनेत्याने घेतले कोट्यवधींचे मानधन

Game Changer Film : टॉलिवूड अभिनेता रामचरण 'गेम चेंजर' चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याने चित्रपटासाठी १०० कोटींहून अधिक मानधन स्विकारले आहे.

Chetan Bodke

टॉलिवूड अभिनेता रामचरण 'RRR' नंतर 'गेम चेंजर' चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. अद्याप चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही, त्या आधीच चित्रपटाबद्दल वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता रामचरणने चित्रपटासाठी ७० ते ८० कोटी रुपये नाही तर १०० कोटींहून अधिक मानधन स्विकारले असल्याची माहिती मिळत आहे.

प्रदर्शनाच्या आधीपासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. पॉलिटिकल ॲक्शन थ्रिलर 'गेम चेंजर' चित्रपट टॉलिवूड इंडस्ट्रीतील बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटाचं बजेट ३५० कोटींच्या आसपास आहे. चित्रपटाची शुटिंग गेल्या काही दिवसांपूर्वीच संपली असून सध्या रामचरण सुट्टीचा आनंद लुटत आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रामचरण आणि कियारा अडवाणी आहे. या चित्रपटासाठी रामचरणने १२५ कोटींचे मानधन स्विकारले आहे. रामचरणचे हे सर्वाधिक मानधन असून कियाराने ही १०० कोटींच्या आसपासच मानधन घेतल्याची चर्चा आहे.

चित्रपटासाठी रामचरणने विशेष मेहनत घेतली आहे. त्याने चित्रपटासाठी खास फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. जीममध्ये बॉडीसाठी विशेष मेहनत घेत असतानाचे अनेक व्हिडीओही शुटिंग दरम्यान व्हायरल झाले होते. एस. शंकर दिग्दर्शित 'गेम चेंजर' चित्रपट येत्या ऑक्टोबर २०२४ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाची शुटिंग संपली आहे. सध्या चित्रपटाचं प्री- प्रॉडक्शनचं काम सुरू आहे. या चित्रपटाबद्दल चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT