Mahesh Babu Daughter Donates First Salary Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mahesh Babu Daughter: कौतुकास्पद! महेश बाबूच्या ११ वर्षांच्या लेकीनं आपल्या पहिल्या पगारातून ‘अशी’ केली गरजूंची मदत

Chetan Bodke

Mahesh Babu Daughter Donates First Salary: टॉलिवूड सुपरस्टार महेश बाबूच्या अभिनयाची ख्याती ही जगभरात आहे. महेशचे फॅन्स अवघ्या जगभरात आहेत. नेहमीच सोशल मीडियावर हा अभिनेता विविध कारणांमुळे चर्चेत असतो. पण सध्या महेश बाबूच्या चाहत्यांचे लक्ष लेक सिताराने स्वत:कडे वेधून घेतले आहे.

ती एका जाहिरातीच्या निमित्ताने न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअरवर झळकली. त्या जाहिरातीसाठी तिने मोठे मानधन आकारल्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगतेय. आता त्या पैशांचं सिताराने काय केलं?, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. अखेर याचं उत्तर समोर आलं आहे.

महेश बाबूची ११ वर्षीय लेक सितारा ४ जुलै रोजी टाइम्स स्क्वेअरवर एका ज्वेलरी ब्रँडची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून झळकली होती. सिताराचा सोशल मीडियावर टाइम्स स्क्वेअरवर झळकलेले फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले. टाईम्स स्क्वेअरवर झळकणारी सितारा ही पहिली भारतीय स्टारकिड ठरलीय. आणि महत्वाची बाब म्हणजे सिताराने याबाबतीत सारा अली खान, जान्हवी कपूर आणि सुहाना खान या स्टारकिड्सला ही मागे टाकलंय.

टाईम्स स्क्वेअरवर झळकलेल्या जाहिरातीत सिताराने डिझायनर ड्रेस परिधान केलेला दिसून येत आहे. तर आणखी एका फोटोत सिताराने साडी नेसून त्यावर भारतीय पद्धतीचे दागिने घालून काही पोज देताना दिसली. या जाहिरातीसाठी ११ वर्षीय सिताराने ज्वेलरी ब्रँडकडून एका जाहिरातीसाठी तब्बल एक कोटी इतकं मानधन घेतलंय. तिने घेतलेल्या मानधनाचा आकडा ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या; तर आता या पैशाचा योग्य वापर करायचं तिने ठरवलं आहे.

टॉलिवूड सुपरस्टार महेश बाबू आणि नम्रता यांची मुलगी सितारा घट्टामनेनी हिने फार कमी वयात मोठी गगनचुंबी झेप घेतली. एका मीडिया रिपोर्टनुसार, तिने एका जाहिरातीतून मिळालेलं हे पहिलं मानधन एका संस्थेला दान केलं आहे. महेश बाबूच्या लेकीच्या निर्णयाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. सोबतच तिच्यावर सोशल मीडियावर देखील कौतुकाचा वर्षाव होत आहे. सिताराने एका ज्वेलरी ब्रँडसाठी ‘प्रिन्सेस’ नावाच्या शॉर्ट फिल्मसोबत हातमिळवणी केली असून त्यात तिने अभिनय देखील केला. सिताराने हैदराबादमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तिची आई नम्रता घट्टमनेनीसोबत तिच्या नावाचे पुस्तकही लाँच केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT