Chiyaan Vikram Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chiyaan Vikram: भीषण अपघात, २३ सर्जरी, चालताही येत नव्हतं.. सुपरस्टार अभिनेत्याची गोष्ट ऐकून तुमचेही डोळे पाणावतील

Actor Chiyaan Vikram Inspirational Story: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चियान विक्रम चर्चेत आला आहे. चियान विक्रमने त्याच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. त्याच्या २३ सर्जरी झाल्या आहेत.

Siddhi Hande

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता म्हणून चियान विक्रमला ओळखले जाते. चियान विक्रमने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चियान लवकरच तंगलान या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात चियान विक्रम हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चियान अभिनयासोबतच वैयक्तिक कारणामुळेही चर्चेत असतो. चियान विक्रमने आपल्या आयुष्यात खूप मोठा संघर्ष केला आहे.

चियानने चित्रपटाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमात भावपूर्ण भाषण केले आहे. त्याने आपल्या संपूर्ण प्रवासाबद्दल माहिती दिली आहे. चियान विक्रमने आपल्या कॉलेजपासूनच नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु त्याच्या करिअरला अचानक ब्रेक लागला. त्याचे कारण म्हणजे चियान विक्रमचा मोठा अपघात झाला होता.

चियान विक्रम मागील तीन वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये होता. त्याच्यावर २३ सर्जरी झाल्या होत्या. चियान विक्रमला चालतादेखील येत नव्हते. त्याला खूप त्रास सहन करावा लागला. एका अपघातामुळे त्याचे पूर्ण आयुष्यचं बदलून केले. परंतु त्याने आता पुन्हा एकदा आपल्या मेहनतीने आणि इच्छाशक्तीने स्वतः च्या पायावर उभा राहिला. चियानने आपला आत्मविश्वास परत मिळवला आणि चित्रपटात काम करण्यासाठी तयार झाला आहे.

चियान विक्रम हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील खूप प्रसिद्ध अभिनेता आहे. चियान विक्रम हा अभिनेत्यासोबत पार्श्वगायक आणि चित्रपट निर्माताही आहे. चियान विक्रमने आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूप संघर्ष केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Officers Transferred: ऐन निवडणुकीत राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली?

Dombivali: डोंबिवलीतील फडके रोडवरील धक्कादायक घटना; टेरेसची भिंत कोसळली

मुंबईत वंचित-काँग्रेस साथ साथ? आघाडीच्या चर्चेसाठी संयुक्त समिती?

Maharashtra Live News Update: निलंगा नगरपालिकेत पराभव झालेल्या उमेदवारांने काढली, आभार रॅली, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

Crime News: माजी पोलीस महानिरीक्षकानं स्वत:वर झाडली गोळी, १२ पानाच्या सुसाईड नोटमधून समोर आलं धक्कादायक कारण

SCROLL FOR NEXT