Allu Arjun Fans Fighting Viral Video Twitter
मनोरंजन बातम्या

Allu Arjun Fans Viral Video: ‘अल्लू अर्जुन की जय’ म्हण नाही तर.... ; बंगळुरूमध्ये तरूणाला बेदम मारहाण

Allu Arjun Fans Fighting Video: टॉलिवूड अभिनेता अल्लू अर्जुनला ‘पुष्पा’ चित्रपटामुळे फार मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहणारा अल्लू अर्जुन सध्या चाहत्यांमुळे चर्चेत आला आहे.

Chetan Bodke

Allu Arjun Fans Fighting Viral Video

टॉलिवूड अभिनेता अल्लू अर्जुनला ‘पुष्पा’ चित्रपटामुळे फार मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. लवकरच अभिनेत्याचा ‘पुष्पा २’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहणारा अल्लू अर्जुन सध्या त्याच्या चाहत्यांमुळे चर्चेत आला आहे. (Tollywood)

सध्या अभिनेत्याच्या एका फॅन्स ग्रुपची जोरदार चर्चा होत आहे. बंगळुरूमधील केआर पुरममध्ये अल्लू अर्जुनच्या चाहत्यामध्ये आणि एका व्यक्तीमध्ये भर रस्त्यात जोरदार भांडणे झाले. 'अल्लू अर्जुन की जय' तरच तुला सोडू, असं म्हणत त्या तरूणाला अल्लू अर्जुनच्या फॅन्सने सांगितले होते. पण त्याने नकार दिल्याने त्याला जबरदस्त मारहाण केली आहे. सध्या हा मारहाणीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. (Actor)

सध्या अल्लू अर्जुन ‘पुष्पा २’च्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. काल अल्लू अर्जुन शुटिंगनिमित्त विशाखापट्टणमला पोहोचला होता. अभिनेता विशाखापट्टणमध्ये चित्रपटाचा खास सीन शूट करण्यासाठी आला आहे. यावेळी अभिनेत्याचे जंगी स्वागत करण्यात आले. असं असताना बंगळुरूमधील केआर पुरममध्ये अल्लू अर्जुनच्या चाहत्यामध्ये आणि एका व्यक्तीमध्ये भर रस्त्यात मारामारी झाली आहे. (Viral Video)

अल्लू अर्जुनच्या फॅन्स ग्रुपने एका तरुणाला 'अल्लू अर्जुन की जय' म्हणायला सांगितले होते. पण तो म्हणाला नाही म्हणून त्यांनी त्याला मारहाण केली, अशी माहिती त्या तरूणाने दिली आहे. तरुणाने अल्लू अर्जुनच्या फॅन्स ग्रुपच्या म्हणण्यानुसार, तसं नं केल्यामुळे त्या तरूणाला जबरदस्त मारहाण केली. (Social Media)

सध्या ह्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ट्विटरवर व्हिडीओ शेअर करून नेटकऱ्यांनी बेंगळुरू पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. नेटकरी म्हणतात, पोलिसांनी या अशा फॅन्सवर कारवाई करावी, हे फॅन्स ऑनलाइन फॅन वॉरसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. नेटकऱ्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत बेंगळुरू पोलिसांनी योग्य ती कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो तरूण प्रभासचा फॅन आहे. त्यामुळे त्या तरूणामध्ये आणि त्या फॅन्स ग्रुपमध्ये वाद झाल्याची शक्यता आहे. (Entertainment News)

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT