Dhanush Saam Tv
मनोरंजन बातम्या

Superstar Dhanush: धनुषच्या चित्रपटाचे तिरुपती मंदिर परिसरात शूटिंग, गर्दी- वाहतूक कोंडीला वैतागून भाविकांची पोलिसांत तक्रार

Dhanush Movie: दिग्दर्शक शेखर कम्मुला यांच्या चित्रपटामध्ये धनुष मुख्य भूमिकेत असणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग तिरुपतीमध्ये सुरू आहे. या शूटिंग दरम्यानचा धनुषचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Dhanush Shooting In Tirupati:

साऊथ सुपरस्टार धनुष (South Superstar Dhanush) त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दिग्दर्शक शेखर कम्मुला यांच्या चित्रपटामध्ये धनुष मुख्य भूमिकेत असणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग तिरुपतीमध्ये सुरू आहे. या शूटिंग दरम्यानचा धनुषचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही त्याला ओळखू देखील शकणार नाहीत. तिरुपती मंदिर परिसरामध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना देखील यामुळे त्रास होत होता. महत्वाचे म्हणजे या चित्रपटाच्या शूटिंगमुळे स्थानिक नागरिकांना त्रास झाला. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या धनुषच्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, धनुष अतिशय गरीब दिसत आहे. वाढलेले आणि विस्कटलेले केस आणि दाढी, खराब झालेले कपडे या लूकमध्ये तो दिसत आहे. शूटिंगसाठी रस्त्यावर कॅमेरे लावलेले दिसत आहे. त्यासोबत चित्रपटाची टीम देखील त्याठिकाणी धनुषशी बोलताना दिसत आहे. रस्त्यावर नागरिकांची प्रचंड वर्दळ दिसत आहे.

धनुषच्या चित्रपटाचे शूटिंग अलिपिरीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ सुरू होते. त्यामुळे पोलिस आणि मंदिर सुरक्षा व्यवस्थेला मंदिराकडे जाणारी वाहने रीडायरेक्ट करावी लागली. यामुळे स्थानिकांची गैरसोय झाली. त्याचसोबत मंदिरामध्ये जाणाऱ्या भाविकांना देखील त्रास झाला. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

चित्रपटाच्या शूटिंगमुळे वाहतुकीचा मार्ग बदलल्याने आणि रस्ता बंद केल्याने प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळे मंदिर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तिरुपतीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी या वाहतूक कोंडीबद्दल पोलिसांनाही विचारणा केली. स्थानिक नागरिक आणि भाविकांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेत चित्रपटाच्या टीमला तिथे शूटिंग का करुन दिले? असा सवाल विचारत याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणात हस्तक्षेप करत चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले.

त्यानंतर बुधवारी सकाळी धनुष तिरुमला मंदिरात भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गेला. धनुष मंदिरामध्ये आल्याचे पाहून त्याठिकाणी असलेल्या त्याच्या चाहत्यांनी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी त्याला घेराव घातला आणि मोठी गर्दी केली. चाहत्यांची गर्दी पाहून त्याठिकाणी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी अभिनेत्याने तात्काळ मंदिर सोडले. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव कळाले नाही पण या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना आणि जमि सरभ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एप्रिलमध्ये तुमचं बँक खातं फ्रीज होणार? आर्थिक संकटामुळे सरकार तुमचे पैसे गोठवणार?

तुमच्या माशांवर केमिकल स्प्रे? तुम्ही खाताय केमिकल मासे?

Maharashtra Live News Update: कळमेश्वर MIDC मध्ये बोगस युरिया बनविणाऱ्या कंपनीवर कृषी विभागाचा छापा

कालव्यात पोहोयला गेले पुन्हा परतलेच नाही; पाण्यातील सिमेंट पाईपमध्ये अडकून ३ तरुणांचा मृत्यू

निवडणूक हरल्याचा राग, ठाकरेंच्या नेत्याचा देवेंद्र शिंदेंवर कोयत्याने प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT